Kolhapur News: गारीवडेत गव्यांचा कळप
भरदिवसा गवे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गारीवडे: गगनबावडा तालुक्यातील गारीवडे परिसरात गव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालती आहे. जंगलातील वैरणीची कमतरता आणि अन्नधान्याच्या शोधात हे वन्यजीव आता थेट गावात प्रवेश करू लागले आहेत.
परवा जर्गी गावात सकाळी आठ वाजता गव्यांचा कळप दिसून आला. काल रविवारी सकाळी साडेदहा वाजता तब्बल वीस गळ्यांचा कळप गारीवडे गावात आला. मर दिवसा गावात गब्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेतकयांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. गये रेडे व अन्य वन्यजीवही गावात येऊ लागल्याने जनावरांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
धुंदवडे, अणदूर, खोकुर्ले, सांगशी या ठिकाणी वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे. संबंधित विभागाला वारंवार कळवूनही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. नागरिकांनी वन विभागाने तातडीने टोकाचे पाऊल उचलावे, अशी मागणी केली आहे.
वन्यजीव संरक्षणासोबतच गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य नियोजनाची गरज आहे. गगनबावडा तालुक्यातील गावांमध्ये वन्यजीवांचा चावर वाढत असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन धोक्यात आले आहे. वन विभागाने तातडीने हस्तक्षेप करून गव्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे, तसेच नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणे अत्यावश्यक आहे.