महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आता युपीआयद्वारे पैसे जमा करता येणार

06:37 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅश डिपॉझिट मशीनमध्ये सुविधा होणार उपलब्ध : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आता लवकरच बँकिंग ग्राहकांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआयद्वारे रोख जमा करता येणार आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिले पतधोरण जाहीर करताना दिली.

ते म्हणाले की युपीआयची लोकप्रियता आणि स्वीकृती लक्षात घेऊन आता त्याद्वारे रोख ठेव सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. ही सुविधा सीडीएम (कॅश डिपॉझिट मशिन) मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.   सध्या डेबिट कार्डचा वापर सीडीएमद्वारे रोख रक्कम जमा करण्यासाठी केला जातो. मात्र आता युपीआयच्या मदतीने पेमेंट करून पैसे काढता येणार आहेत.

कॅश डिपॉझिट मशीनमुळे ग्राहकांची सोय वाढते

रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, बँकांद्वारे बसवलेल्या रोख ठेव मशीनमुळे ग्राहकांची सोय वाढते. यामुळे बँक शाखांवरील रोकड हाताळण्याचा भारही कमी होतो.

युपीआयची लोकप्रियता आणि त्याद्वारे कार्डलेस पैसे काढण्यापासून मिळालेला अनुभव लक्षात घेता, रोख ठेवीची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. ते कसे चालवले जाईल याची माहिती लवकरच दिली जाईल.

पीपीआय वॉलेटमधून युपीआय पेमेंटला परवानगीचाही प्रस्ताव

याशिवाय आरबीआयने पीपीआय (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स) म्हणजेच वॉलेटद्वारे युपीआय पेमेंट करण्यासाठी थर्ड-पार्टी अॅप्स वापरण्याची परवानगी देण्याचाही प्रस्ताव दिला आहे. सध्या, वॉलेटद्वारे युपीआय पेमेंट करण्याची सुविधा केवळ पीपीआय कार्ड जारी करणाऱ्या कंपनीची वेबसाइट किंवा मोबाइल अॅप वापरून केली जाऊ शकते. शक्तिकांत दास यांनी निवेदनात म्हटले आहे की, यामुळे पीपीआय कार्डधारकांना बँक खातेदारांप्रमाणे युपीआय पेमेंट करण्यास मदत होईल.

म्हणजेच वॉलेटमधील पैसे युपीआयद्वारे कोणत्याही प्रकारच्या पेमेंटसाठी देखील वापरले जाऊ शकतात.

पीपीआय वॉलेटद्वारे युपीआय पेमेंट करण्याची सुविधा मिळाल्यानंतर, तुमच्याकडे प्रीपेड कार्ड, स्मार्ट कार्ड किंवा मोबाइल पीपीआय वॉलेट असल्यास, तुम्ही त्यात ठेवलेले पैसे युपीआयद्वारे खर्च करू शकाल. यासाठी फोनपे, गुगलपे, अॅमेझॉनपे आणि इतर थर्ड पार्टी युपीआय अॅप्स वापरण्यास सक्षम राहणार आहे.

5 सप्टेंबर 2023 रोजी कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरू

5 सप्टेंबर 2023 रोजी कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली.

देशात यापूर्वी एटीएममधून फक्त क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा होती. 5 सप्टेंबर 2023 रोजी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयद्वारे युपीआयच्या मदतीने रोख काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली. याला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल सिस्टीम असेही म्हणतात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article