For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता रेल्वे तिकिटांसाठी युपीआय पेमेंट

12:03 PM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता रेल्वे तिकिटांसाठी युपीआय पेमेंट
Advertisement

102 काऊंटरवर क्युआर कोडची सुविधा

Advertisement

बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईलद्वारे जलद युपीआय पेमेंट करता यावे यासाठी रेल्वेस्थानकांवर क्युआर कोड देण्यात आला आहे. यामुळे आता प्रवाशांना एका क्लिकवर तिकीट बुकिंग करून पेमेंट करणे सोयीचे होणार आहे. इतर सर्व विभाग डिजिटल होत असताना नैर्त्रुत्य रेल्वेनेही आपले डिजिटल पाऊल पुढे केले आहे. 87 रेल्वेस्थानकांवरील 102 काऊंटरवर अनारक्षित तिकीट प्रणाली काऊंटरवर क्युआर कोड उपलब्ध करून दिला आहे.

यापूर्वी ही सुविधा नसल्याने प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना अनेक अडचणी येत होत्या. बऱ्याच वेळा चिल्लरची चणचण भासत होती. यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने क्युआर कोडद्वारे पेमेंट करण्याची सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला हुबळी रेल्वेस्थानकात याची चाचणी घेण्यात आली. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता इतर रेल्वेस्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बेळगाव रेल्वेस्थानकाच्या अनारक्षित काऊंटरसोबतच एटीव्हीएम मशीनवरदेखील क्युआर कोड दिला जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा ठरेल, असे हुबळी विभागीय व्यवस्थापक हर्ष खरे यांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.