महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आता कुस्तीपटूंविरोधात कुस्तीपटूंचेच आंदोलन

06:57 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
New Delhi, Jan 03 (ANI): Junior wrestlers protest against Bajrang Punia, Sakshi Malik, and Vinesh Phogat at Jantar Mantar, in New Delhi on Wednesday. (ANI Photo/Ishant)
Advertisement

बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यावर कुस्तीची हानी केल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

गेले वर्षभर देशातील तीन ज्येष्ठ कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेविरोधात चालविलेल्या आंदोलनाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट या आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या विरोधात बुधवारी अनेक नवे कुस्तीपटू उभे राहिले आहेत. या ज्येष्ठ कुस्तीपटूंच्या हट्टाग्रहापोटी कुस्ती खेळाची हानी झाली असून कनिष्ठ कुस्तीपटूंचे मोलाचे एक वर्ष वाया गेले. त्यामुळे त्यांच्या करिअरवर विपरीत परिणाम झाला, असा त्यांचा आरोप आहे. कुस्ती क्षेत्रातील कार्ये आता पुन्हा हाती घेतली जावीत, अशी त्यांची मागणी आहे.

हे आंदोलन बुधवारी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या तीन राज्यांमधील विविध नवीन कुस्तीपटूंनी केले. या प्रतिआंदोलनात 200 हून अधिक नवे कुस्तीपटू सहभागी झाले होते. ते अनेक बसेसमधून दिल्लीतील जंतर मंतर येथे एकत्र जमले आणि त्यांनी या तिघांविरोधात जोरदार आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला सर्वसामान्य लोकांचाही मोठे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

तिघांविरोधात घोषणा

वर्षभरापासून कुस्ती संघटना आणि संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या तीन ज्येष्ठ कुस्तीपटूंच्या विरोधात या नव्या कुस्तीपटूंनी जोरदार घोषणा दिल्या. ‘या तिघांपासून आमची कुस्ती वाचवा’ अशी घोषणा असणारे फलक या नवकुस्तीपटूंनी हातात धरले होते. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तथापि, या कुस्तीपटूंनी त्यांचा राग व्यक्त केला.

एक वर्षापूर्वी याच स्थानी...

साधारणत: एक वर्षापूर्वी याच जंतरमंतरवर या तीन ज्येष्ठ कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटना आणि खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आवाज उठविला होता. त्यावेळी या कुस्तीपटूंनी मोठ्या प्रमाणात लोकांची सहानुभूती आणि समर्थन मिळवण्यामध्येही यश मिळविले होते. तथापि, बुधवारी याच स्थानी त्यांच्याविरोधात त्यांच्याच क्षेत्रातील नवोदितांनी आंदोलन करत त्यांचा निषेध केला आहे.

नवोदितांच्या अडचणी कोणत्या?

नवोदित कुस्तीपटूंच्या अडचणी त्यांनी मांडल्या आहेत. या तीन कुस्तीपटूंनी आंदोलनाला प्रारंभ केल्यानंतर ते वर्षाहून अधिक काळ विनाकारण ताणले. त्यामुळे गेले वर्षभर कुस्ती संघटनेकडून कुस्तीपटूंसाठी आयोजित करण्यात येणारी प्रशिक्षण शिबिरे बंद करण्यात आली आहेत. या आंदोलनामुळे दोनवेळा भारतीय कुस्ती संघटनेची मान्यता जागतिक कुस्ती संघटनेने काढून घेतली होती. याचा विपरीत परिणाम कुस्ती प्रशिक्षणावर झाला. नवोदितांना घरी बसून रहावे लागले, किंवा स्वत:च्या खर्चाने खासगी प्रशिक्षकांकडून ते घ्यावे लागले. त्यामुळे आता कुस्ती संघटनेची मान्यता पुन्हा मिळवून द्या आणि नवोदितांच्या करिअरला आकार द्या, अशी मागणी या नवकुस्तीपटूंनी केंद्र सरकार आणि क्रीडा विभागाकडे केली आहे.

अद्याप प्रतिक्रिया नाही

अद्याप या नवोदितांच्या आंदोलनावर या तीन ज्येष्ठ कुस्तीपटूंनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण अशा आंदोलन-प्रतिआंदोलनामुळे कुस्तीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अनेक माजी कुस्तीपटूंनी व्यक्त केली आहे. नव्याने निवडून आलेली कुस्ती संघटना केंद्र सरकारने ज्येष्ठ कुस्तीपटूंच्या विरोधामुळे रद्द केली. त्यानंतर तरी या 3 ज्येष्ठ कुस्तीपटूंनी प्रकरण अधिक ताणायल नको होते, असेही मत अनेक जुन्या कुस्तीपटूंनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article