For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर

06:58 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आता लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर
Advertisement

या सप्ताहात संघनिवड, राहुल,   शमी,  जडेजा यांचे स्थान अनिश्चित, अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडण्यासाठी निवड समिती या आठवड्याच्या शेवटी बैठक घेणार असून दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फॉर्मात नसले, तरी भारताच्या एकदिवसीय संघाच्या फलंदाजीची ती केंद्रस्थाने राहतील. परंतु किमान तीन वरिष्ठ खेळाडू असे आहेत ज्यांचे 50 षटकांच्या स्वरुपातील भविष्य हे अनिश्चित आहे.

Advertisement

के. एल. राहुल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा हे जरी गेल्या वर्षीच्या विश्वचषकाचा भाग राहिलेले असले, तरी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वरील स्पर्धेत त्यांना स्थान मिळणे निश्चित नाही. तेव्हापासून भारत सहा एकदिवसीय सामने खेळलेला असून शमी आणि जडेजाला त्यात विश्रांती देण्यात आली असताना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविऊद्धच्या मालिकांसाठी राहुलचा समावेश करण्यात आला होता. परंतु राहुलला श्रीलंकेविऊद्ध मधल्या षटकांमध्ये अपयशी ठरल्याने मालिकेच्या मध्यभागी वगळण्यात आले.

19 नोव्हेंबर, 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविऊद्ध भारताला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचे मुख्य कारण 100 पेक्षा जास्त चेंडू वापरून राहुलने झळकावलेले संथ अर्धशतक होते आणि ते क्रीडा रसिक अद्याप विसरलेले नाहीत. यशस्वी जैस्वालला एकदिवसीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता असून त्याचा समावेश झाल्यास पहिल्या चार फलंदाजांमध्ये एक डावखुरा फलंदाज निश्चित होईल. पण जर रिषभ पंतला यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती राहिली, तर राहुलला ‘बॅकअप’ म्हणून घेण्यात काही अर्थ राहील का असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे, जर राहुल यष्टिरक्षण करत नसेल, तर निव्वळ फलंदाज म्हणून त्याचे स्थान खात्रीचे नाही.

राहुलच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपैकी इशान किशनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुरेशा धावा केलेल्या नाहीत, तर संजू सॅमसनला सुऊवातीचे सामने हुकल्यानंतर केरळने त्याची निवड केली नाही. परंतु प्रशिक्षक गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठीच्या संघाच्या निवडीच्या बाबतीत जशी भूमिका बजावली तशीच ती यावेळीही कायम राहिली तर सॅमसन निश्चितपणे संघात पोहोचेल. कारण तो त्याच्या आवडीच्या खेळाडूंपैकी एक आहे. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बांगलादेशविऊद्धच्या सुरुवातीच्या लढतीपासून भारत त्यांचे सर्व चॅम्पियन्स ट्रॉफी सामने दुबईमध्ये खेळेल. सुरक्षेच्या कारणास्तव संघाने मूळ यजमान पाकिस्तानच्या भूमीत जाण्यास नकार दिल्याने असा बदल करण्यात आला आहे.

रवींद्र जडेजाची मर्यादित षटकांच्या सामन्यांतील फलंदाजी पूर्वीसारखी चांगली राहिलेली नाही आणि निवड समितीचा मागोवा घेणाऱ्यांना वाटते की, अक्षर पटेलकडे या क्षणी एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक प्रभावी खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. वॉशिंग्टन सुंदरला ऑफस्पिनर म्हणून खेळविले जाण्याची अपेक्षा आहे,  तर कुलदीप यादवच्या फिटनेसवर निवड समितीची नजर राहील. कुलदीप पूर्ण तंदुऊस्तीच्या जवळ आहे, पण तो विजय हजारे ट्रॉफीचा एकही सामना खेळलेला नाही. कुलदीप संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरल्यास रवी बिश्नोई किंवा वऊण चक्रवर्ती यांच्यापैकी एकाची निवड अपेक्षित आहे.

मोहम्मद शमीच्या बाबतीत त्याच्या फिटनेस स्थितीबद्दल आवश्यक स्पष्टता दिसत नाही. तथापि, त्याने गेल्या दोन विजय हजारे ट्रॉफी सामन्यांमध्ये प्रत्येकी आठ षटके टाकली आहेत आणि जर जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे संघात येऊ शकला नाही, तर शमीचा अनुभव संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हार्दिक पंड्या हा सीम गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू असून नितीश रे•ाrचा विचार केला जातो का हे पाहावे लागेल. राखीव फलंदाजांमधील रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते.

यशस्वी जैस्वालचे होणार वनडेत पदार्पण

कसोटी, टी 20 क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरीनंतर स्टार डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल वनडेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी इंग्लंड व चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जैस्वालला टीम इंडियात स्थान दिले जाऊ शकते. जैस्वालला स्थान मिळाल्यास शुभमन गिलला मात्र स्थान मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तिसऱ्या विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजी करु शकतात.

निवड समिती नितीश कुमार रेड्डीचा पर्याय तपासणार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत शतकी खेळी साकारल्यानंतर युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डी चर्चेत आला आहे. युवा फलंदाजाने ऑस्ट्रेलियात दम दाखवला असून स्थानिक सामन्यातही त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. येत्या रविवारी निवड समिती युवा खेळाडूसह रोहित व विराट कोहलीशी चर्चा करणार आहे. या चर्चेत इंग्लंड व चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघ निवडीबाबत चर्चा होईल. यानंतरच संघ निवड केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.