For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता भुतरामहट्टीत सिंहिणीची गर्जना

11:16 AM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
आता भुतरामहट्टीत सिंहिणीची गर्जना
Advertisement

भृंगा नावाची सिंहीण दाखल : पर्यटकांना आकर्षण

Advertisement

बेळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात 9 वर्षीय मादी जातींची सिंहीण दाखल झाली आहे. त्यामुळे संग्रहालयात आता छोट्या सिंहिणीची गर्जना ऐकावयास मिळणार आहे. बनेरघट्टा येथील संग्रहालयातील भृंगा नावाची ही सिंहीण आणण्यात आली आहे.

भुतरामहट्टी येथील संग्रहालयात 2019 पासून विविध वन्यप्राणी दाखल झाले होते. त्यामध्ये तीन सिंहांचा समावेश होता. मात्र 2021 मध्ये नकुल तर 6 फेब्रुवारी 2025 मध्ये निरुपमा नावाच्या सिंहिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संग्रहालयात केवळ नर जातीचा एकच सिंह शिल्लक राहिला होता. दरम्यान, संग्रहालय व्यवस्थापनाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे सिंहांसाठी प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आता संग्रहालयात मादी जातीची सिंहीण दाखल झाली आहे.

Advertisement

सध्या शाळांना उन्हाळी सुटी सुरू झाल्याने संग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. त्याबरोबर बेळगावसह महाराष्ट्र आणि गोवा येथूनही पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. सद्यस्थितीत संग्रहालयात वाघ, मोर, अस्वल, मगर, कोल्हे, तरस, हरिण, विविध जातींचे पक्षी आणि मत्स्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना विविध जातींचे वन्यप्राणी एकाच छताखाली पहाता येत आहेत. जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहाचे पर्यटकांना दर्शन होणार आहे.

संग्रहालयाचा टप्प्याटप्प्याने विकास

प्राणीसंग्रहालयात 9 वर्षीय भृंगा नावाची बनेरघट्टा येथून सिंहीण आणण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना अगदी जवळून दर्शन होणार आहे. त्याबरोबर संग्रहालयाचा टप्प्याटप्प्यात विकास साधला जात आहे. सध्या विशेष होल्डिंग रुममध्ये या सिंहिणीला ठेवण्यात आले आहे. लवकरच पर्यटकांसाठी या सिंहिणीचे दर्शन दिले जाणार आहे.

- पवन कालिंग (आरएफओ, भुतरामहट्टी)

Advertisement
Tags :

.