महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आता न्यायालयच निर्णय देणार

03:07 PM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रा. सुभाष वेलिंगकर यांची भूमिका : तीन तास पोलिसांना दिली माहिती

Advertisement

डिचोली : आपल्या विधानाबद्दलचे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर आता इथे काहीही बोलणार नाही. न्यायालयातच काय ते बोलणार, न्यायालयच त्यावर काय तो निर्णय घेणार, अशी प्रतिक्रिया प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी डिचोली पोलिसस्थानकाबाहेर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वेलिंगकर यांच्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दलच्या विधानामुळे उडालेल्या गोंधळानंतर वेलिंगकर यांनी काल शुक्रवारी प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वेलिंगकर यांनी डिचोली पोलिसस्थानकावर काल सकाळी हजेरी लावली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. सुमारे 3 तासांच्या या चौकशीनंतर दुपारी 1 वा. वेलिंगकर पोलिसस्थानकातून बाहेर पडले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की पोलिसांना आपण पूर्ण सहकार्य दिले आहे. आपल्याला विचारलेली सर्व माहिती त्यांना दिली आहे. यापुढेही पोलिसांना आपण सहकार्य करणार आहे. जर पुन्हा बोलावले तर येणार आहे.

Advertisement

देशभरातून वेलिंगकरांना वाढता पाठिंबा

फेसबूक, इन्स्टाग्राम, एक्स या सामाजिक माध्यमांद्वारे राष्ट्रीयस्तरावर अनेकांनी प्रा. सुभाष वेलिंगकर यांना आपले जोरदार समर्थन असल्याचे दर्शवले आहे. ‘एक्स’ या सामाजिक माध्यम व्यासपीठावर We support Velingkar आणि #Xavier_Not_ goechosayab या पोस्ट राष्ट्रीय स्तरावर हजारो समर्थकांनी कमेंट केल्याने हा विषय ‘एक्स’ वर ट्रेंडिंगमध्ये आला. यावरून प्रा. वेलिंगकर यांच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावरही हिंदूंचा भरपूर पाठिंबा असल्याचे दिसून आले. प्रा. वेलिंगकर यांच्या मागणीमुळे ख्रिश्चन समाजाप्रमाणे हिंदूंच्या भावनाही दुखावल्याचा जो दावा विरोधक करतात, त्यात फारसे तथ्य नसल्याचेही यावरून लक्षात येते. सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेषांची डीएनए चाचणी करावी, अशी जी मागणी श्रीलंकन पत्रकार डब्ल्यू. टी. जे. एस. कविरत्ने यांनी 2014 साली गोव्यात पत्रकार परिषद घेऊन केली होती, तिचा पुनऊच्चार गोव्यातील हिंदू नेते प्राचार्य सुभाष वेलिंगकर यानी केल्यानंतर गेले काही दिवस गोव्यात तो विषय गाजत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article