कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

. आता घ्या ‘सौरकांबळे’

06:35 AM Sep 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावसाळ्यात आणि हिंवाळ्यात थंडी वाजणे हा सार्वत्रिक अनुभव आहे अगदीच विषुववृत्तयी आणि उष्ण कटिबांधातील भूभाग सोडले तर इतरत्र वर्षातील तीन ते चार महिने चांगली थंडी असते. ध्रूवीय आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये तर वर्षाला आठ महिने कडाक्याची थंडी असते. या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या गरम कपडे, कांबळी, पांघरुणे इत्यादींची आवश्यकता निर्माण होते.

Advertisement

भारतासारख्या समशीतोष्ण देशामध्ये थंडीच्या वेळी स्वेटर घातला किंवा झोपताना दोन तीन पांघरुणे घेतली की उबदार वाटते. तथापि, युरोप आणि इतर ध्रूवीय प्रदेशांमध्ये एवढ्याने भागत नाही. कारण तेथे थंडी इतकी प्रचंड असते, ती केवळ काही पांघरुणे पुरेशी ठरत नाहीत. लोकांच्या याच गैरसोयीतून प्रेरणा घेऊन स्कॉटलंड येथील 13 वर्षांची एक विद्यार्थिनी रेबेका हिने सौर कांबळे बनविले आहे. तिच्या या कल्पक शोधाने तिला टाईम नियतकालिकाच्या ‘गर्ल्स ऑफ द इयर’ या सन्माननीय सूचीत स्थान मिळाले आहे. हे कांबळे विशिष्ट धाग्यांपासून बनविण्यात आले आहे. ते दिवसा, म्हणजे सूर्य आकाशात असताना त्याच्यावरच्या सौरपॅनेल्समुळे उष्ण होते. नंतर रात्री थंडी पडली की, ते पांघरल्याने त्याच्यात साठविलेली उष्णता आपल्या मिळून थंडी कोठल्या कोठे पळून जाते. केवळ माणसांसाठी नव्हे, तर पाळीव प्राण्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठीही ते उपयोगी पडते. ज्यांना उघड्यावर रहावे लागते, त्यांच्यासाठी हा शोध एक वरदानच आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article