For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता पोस्टाने मागवा आंबे!

10:20 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता पोस्टाने मागवा आंबे
Advertisement

बेळगाव : हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. बऱ्याच वेळा आंबा खरेदीदारांकडून फसवणूक होत असते. यासाठी पोस्ट विभागातर्फे सध्या बेंगळूर मुख्य कार्यालयातून आंबे घरपोच पोहोचविले जात असून बेळगावमध्येही हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. कर्नाटक राज्य आंबा विकास व मार्केटिंग सहकारी नि. संस्थेच्या सहकार्यातून 2019 पासून पोस्ट कार्यालयाने हा उपक्रम सुरू केला आहे. स्थानिक आंबा उत्पादकांना हा उपक्रम साहाय्यभूत ठरत आहे. यावर्षी 92 हजार 265 आंबा पार्सल घरोघरी पोहोचविली आहेत. 3 किलोची आंब्यांची पेटी तयार केली आहे. स्थानिक उत्पादकांकडून आंब्यांचे व्यवस्थित पॅकिंग करून विक्री केली जात आहे. त्यामुळे आंबे विकणाऱ्या उत्पादकांना चांगली किंमत मिळत आहे. सध्या पोस्ट विभागाने बुकिंग करा, आंबे मिळाल्यावर पैसे द्या, अशी व्यवस्था केली आहे. यामुळे राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून आंब्यांचे बुकिंग करता येणार आहे.

Advertisement

बेळगावमध्येही लवकरच...

आंबा उत्पादकांना चांगले पैसे मिळण्यासाठी पोस्ट विभागाने उपक्रम सुरू केला आहे. याला बेंगळूर कार्यालयात उत्तम प्रतिसाद मिळाल्याने राज्यातील इतर शहरांमध्येही ही सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. बेळगाव परिसरातील आंबा उत्पादकांशी चर्चा सुरू असून योग्य दरात आंबे उपलब्ध झाल्यास लवकरच बेळगावमध्येही हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.

-विजय वडोनी, पोस्ट अधीक्षक, बेळगाव

Advertisement
Tags :

.