For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता प्रत्येकाच्या हाती ‘टाटा’चा आयफोन

06:56 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता प्रत्येकाच्या हाती ‘टाटा’चा आयफोन
Advertisement

तामिळनाडूत सुरु करणार मेगा आयफोन फॅक्टरी : 50, 000 जणांना रोजगार मिळणार असल्याचे संकेत

Advertisement

नवी दिल्ली :

भारतातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा समूहाने तामिळनाडूतील होसूर येथे सर्वात मोठा आयफोन उत्पादन कारखाना उभारण्याची योजना आखली आहे. टाटा भारतातील सर्वात मोठ्या आयफोन निर्मिती प्रकल्पावर काम करत आहे ज्यामुळे 50,000 लोकांना रोजगार मिळणार आहे, असे म्हटले जात आहे.

Advertisement

टाटा आयफोनचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अॅपलची इतर उत्पादने दक्षिण आशियाई देशात बनवण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी तामिळनाडूच्या होसूरमध्ये भारतातील सर्वात मोठा आयफोन असेंब्ली प्लांट उभारणार आहे, ही माहिती नुकत्याच आलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे. या नवीन आयफोन फॅक्टरीमध्ये 20 पेक्षा जास्त असेंबली लाईन्स राहणार आहेत.

पुढील 12 ते 18 महिन्यांत हा प्लांट सुरू करण्याची टाटाची योजना आहे. तामिळनाडूच्या होसूरमध्ये टाटाचा हा आयफोन प्लांट अॅपलच्या सप्लाय चेनचे स्थानिकीकरण करण्यात मोठी भूमिका बजावू शकतो, यासोबतच टाटासोबतचे नाते अधिक घट्ट करू शकते.

टाटाची कर्नाटकात आधीच आयफोन फॅक्टरी आहे जी त्याने अलीकडे विस्ट्रॉनकडून खरेदी केली आहे. देशातील सर्वात मोठा आयफोन प्लांट तामिळनाडूमध्ये कार्यान्वित झाल्यानंतर, तो कर्नाटकातील आयफोन प्लांटच्या उत्पादन दराला मागे टाकू शकतो.

तामिळनाडूमध्ये आयफोन असेंब्ली प्लांट 2024 च्या अखेरीस सुरू होऊ शकतो. यानंतर, स्थानिक उत्पादनामुळे अॅपलच्या स्मार्टफोनची किंमत देखील कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे अॅपल आणि सॅमसंगमधील स्पर्धा वाढण्याची शक्यता असून यात अॅपलला फायदा होईल. टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा होसूर येथे आधीच एक उत्पादन कारखाना कार्यरत आहे, जिथे 5000 लोक काम करत आहेत. हा प्लांट आयफोनचे बाह्य उपकरणे बनवण्याचे काम करत आहे.

Advertisement
Tags :

.