For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता हेस्कॉममध्येही बदल्यांचे वारे सेक्शन ऑफिसरना मात्र अढळ ध्रुवपद

10:33 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता हेस्कॉममध्येही बदल्यांचे वारे सेक्शन ऑफिसरना मात्र अढळ ध्रुवपद
Advertisement

बेळगाव : हेस्कॉमच्या बेळगाव विभागात बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. मागील काही वर्षांपासून शहर उपविभाग-2 मध्ये कार्यरत असलेले साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करुर यांची ग्रामीण उपविभाग-1 मध्ये बदली करण्यात आली. तर सदलगा येथील संजीवकुमार सुखसारे यांची शहर उपविभाग-2 मध्ये बदली करण्यात आली आहे. हेस्कॉममध्ये मागील अनेक दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. ग्रामीण उपविभाग-1 मध्ये कार्यरत असलेले राघवेंद्र यांची तातडीने इतरत्र बदली करण्यात आल्याने ही जागा रिक्त होती. यापूर्वी बेळगाव तालुक्यामध्ये काम केलेले विनोद करूर यांच्याकडे पुन्हा एकदा तालुक्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या कामामुळे ग्रामीण भागात त्यांची बरीच ओळख् आहे. त्यामुळे विकासकामे राबविताना सोयीचे ठरणार आहे. विनोद करूर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी सदलगा येथे कार्यरत असणारे संजीवकुमार सुखसारे यांची बदली करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शहर उपविभाग-2 चा कार्यभार स्वीकारला. बेळगाव दक्षिण विभागातील शहापूर, वडगाव, अनगोळ, उद्यमबाग व इतर औद्योगिक वसाहती या विभागामध्ये येतात. विशेषत: उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतींना 24 तास सुरळीत वीजपुरवठा पुरविणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांना काही काळ या भागाची माहिती घेऊन अभ्यास करावा लागणार आहे.

Advertisement

सेक्शन ऑफिसरची बदली कधी?

बेळगाव शहरात मागील अनेक दिवसांपासून सेक्शन ऑफिसरच्या बदल्या झालेल्या नाहीत. काही सेक्शन ऑफिसर तर मागील अनेक वर्षांपासून शहरामध्येच कार्यरत आहेत. त्यामुळे इतर सेक्शन ऑफिसरनाही शहरात काम करण्याची संधी देण्याची गरज आहे. काही कर्मचारी राजकीय वरदहस्तामुळे शहरी भागातच चिकटून आहेत. यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शहरातील सेक्शन ऑफिसर्सची बदली करावी, अशीही मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.