आता बाहुलीलाही होणार डायबिटिज
बाजारात आली ‘आजारी बार्बी डॉल
मुलींना जर बार्बी डॉल दिसली तर ती त्यांना हवी असते. बार्बी डॉल जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. अलिकडेच बार्बीने स्वत:ची एक नवी बाहुली सादर केली असून तिला टाइप-1 डायबिटिज आहे.
मॅटल कंपनीने स्वत:चा प्रसिद्ध ब्रँड बार्बी अंतर्गत एक नवे आणि साहसी पाऊल उचलले आहे. कंपनीने अलिकडेच टाइप-1 डायबिटिजने पीडित पहिल्या बार्बी डॉलला लाँच केले आहे. ही बाहुली मुलांमध्ये आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासह समावेशक ठरणार आहे. नवी बार्बी डॉल स्टायलिश असण्यासह आरोग्य तंत्रज्ञानानेही युक्त आहे. तिच्या हातावर एक कंटीन्यूअस ग्लूकोज मॉनिटर (सीजीएम) लावण्यात आला असून तो एक गुलाबी हृदयाच्या आकाराच्या मेडिकल टेपने चिकटलेला आहे. तसेच कंबरेवर एक इन्सुलिन पंप असून तो गरजेप्रसंगी स्वयंचलित स्वऊपात इन्सुलिन डोस देऊ शकतो. याचबरोबर बार्बी फोन असून त्यात एक सीजीएम अॅप दिसून येते, हे सर्व प्रत्यक्षात डायबिटिज रुग्णांच्या दिनक्रमाशी साधर्म्य दर्शविणारे आहे.
बाहुलीला आहे आजार
बार्बीने निळ्या रंगाचा डॉट टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. निळा रंग आणि गोलाकार प्रिंट जागतिक स्तरावर डायबिटिज जागरुकतेचे प्रतीक मानले जाते. अशाप्रकारे ही डॉल केवळ एक खेळणी नसून जागरुकतेचे माध्यमही ठरली आहे. या पुढाकाराला अचूकपणे आणि भावनेसह सादर करण्यासाठी मॅटलने ब्रेकथ्रू टी1डी नावाच्या आंतरराष्ट्रीय डायबिटिज संशोधन आणि समथंन संस्थेसोबत भागीदारी केली आहे. या डॉलच्या माध्यमातून आम्ही एक अशा स्थितीला दृश्यता देत आहोत, जी लाखो परिवारांना प्रभावित करते. ही मुलांना टाइप-1 डायबिटिजसह देखील एक पूर्ण, सशक्त जीवन जगता येऊ शकते हे दाखवून देण्याची संधी देते असे संस्थेचे सीईओ डॉ. आरोन जे. कोवाल्स्की यांनी म्हटले आहे.