For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : आता सांगली - मिरजेतील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज सुविधा मिळणार

04:10 PM Oct 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
sangli news   आता सांगली   मिरजेतील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज सुविधा मिळणार
Advertisement

                                                     सांगली, मिरजेला मिळणार चार वीज उपकेंद्रे

Advertisement

सांगली : महावितरण व सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांच्यातील जागा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने महावितरणला सांगली व मिरज शहरांत तीन वीज उपकेंद्र उभारणी करिता जागा उपलब्ध झाली आहे. तर कुपवाड एमआयडीसी येथे उद्योगांकरिता उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्राच्या जागेचा प्रश्रही मार्गी लागला आहे. यामुळे सांगली व मिरजेतील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज सेवा मिळणार आहेत. अशी माहिती राज्य वीज मंडळाच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर यांनी दिली.

महावितरणच्या विश्रामबाग सांगली येथील प्रशिक्षण केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सांगली मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे यांची विशेष उपस्थिती होती.

Advertisement

यावेळी नीता केळकर म्हणाल्या, 'सांगली शहरातील स्फूर्ती चौक ते आलदर चौक या दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया ही महावितरणच्या जागा हस्तांतरणासाठी प्रलंबित होती. या जागेच्या बदल्यात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका महावितरणला चार पर्यायी ठिकाणी जागा देणार आहे.

यामुळे शिंदे मळा (ऊर्मिला नगर), कुंभार मळा (वानलेसवाडी), गणी मळा (मिरज) येथे उपकेंद्र उभारणार आहेत. तसेच मिरज शहरात बसेस करिता ई-चार्जिंग स्टेशनसाठी महानगरपालिका महावितरणला जागा उपलब्ध करून देणार आहे.

यामुळे स्फूर्ती चौक ते आलदर चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचा विषय मार्गी लागण्या बरोबरच दोन्ही शहरातील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार बीज सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच सांगली-मिरजेतील वीज खांब स्थलांतर करण्याकरिता डीपीडीसी निधीतून महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित १ कोटी मंजूर होत आहेत.'

केळकर म्हणाल्या, 'कुपवाड एमआयडीसी येथेही उपकेंद्र उभारण्याच्या दृष्टीने महावितरण व एमआयडीसी यांच्यात जागा हस्तांतरणाचा विषय लवकरच मार्गी लागणार असून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या संचालक मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

येथे उपकेंद्र उभारल्याने कुपवाड एमआयडीसी मधील औद्योगिक ग्राहकांना वाढीव वीज भार देणे तसेच नवीन उद्योगांना वीज जोडणी देणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग येऊन रोजगार निर्मिती होणार आहे.

शेतीला दिवसा वीज यावर बोलताना केळकर म्हणाल्या, 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे काम जिल्ह्यात जलद गतीने चालू आहे. आजअखेर जिल्ह्यात १७ प्रकल्प कार्यान्वित झाले असून यातून ४७ हजार ६३७ शेतकयांना दिवसा वीज मिळत आहे. तर या प्रकल्पातून ११४ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे

यामुळे सांगली जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिल्ह्यात अजून १८ प्रकल्पांचे काम प्रगती पथावर असून यातून १७९ मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ठ आहे. जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील १० हजार ३६५ वीज ग्राहक छतावर वीज निर्मिती करत आहेत. यातील ८ हजार ६५५ घरगुती ग्राहक पीएम सूर्यघर योजनेतून अनुदान घेतले असून यातील बहुतांश ग्राहकांचे बीज वापरानुसार वीज बिल शून्य झाले आहे.

Advertisement
Tags :

.