महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपचे आता ‘गाव चलो अभियान’

10:58 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : निवडणूक प्रमुख आशिष सूद यांच्या बैठका

Advertisement

पणजी : भाजपचे वरिष्ठ नेते आणि गोवा निवडणूक प्रमुख आशिष सूद यांनी गोवा भाजप गाभा समितीसोबत (कोअर कमिटी) बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘गाव चलो अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर दिली. पणजीतील भाजप कार्यालयात काल सोमवारी ही बैठक घेण्यात आली. डॉ. सावंत व गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गोव्यातील लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. सुद यांनी गोव्यातील भाजप नेत्यांची ओळख कऊन घेतली तसेच राज्यातील विविध ठिकाणच्या दौऱ्यात त्यांनी भाजपचे आमदार, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Advertisement

दोन्ही जागा भाजपच जिंकणार

डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक तयारी जोमाने सुऊ असून गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे. पक्षातर्फे ‘गाव चलो अभियान’ सुरू करण्याचे ठरवण्यात आले असून पक्षाचे सर्व कार्यकर्ते गावात जाऊन बूथ पातळीवर प्रचार करतील, अशी माहिती त्यांनी दिली. पणजीत भाजप गाभा समितीबरोबर झालेल्या बैठकीस केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री चंद्रकांत कवळेकर, नीलेश काब्राल, नरेंद्र सावईकर, दामू नाईक, गोविंद पर्वतकर व संजीव देसाई उपस्थित होते.

मोदींच्या सभेचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची मडगावला होणारी जाहीरसभा याचाही सूद यांनी आढावा घेतला. मोदींच्या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित रहावा म्हणून त्यांनी भाजप नेत्यांना, कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

भोमवासियांची घेतली भेट

भोम येथील महामार्ग विस्ताराचा विषय सध्या वादग्रस्त बनला असून सूद यांनी तेथे जाऊन स्थानिक लोकांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकले व ग्रामस्थांनी त्यांना निवेदन सादर केले. त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन सूद यांनी दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article