महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मुंबई-गोवा’साठी आता पुन्हा ‘तारीख पे तारीख’

06:53 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गेले वर्षभर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डिसेंबर 2023 अखेर पूर्णत्वास जाईल अशा प्रकारची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सातत्याने कोकणात फिरताना करीत होते. आता 2023 सरायला आले. मात्र चौपदरीकरणाचे अडलेले घोडे अजूनही गंगेत न्हाताना दिसत नाही. सिंधुदुर्ग वगळता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अजून पुष्कळ काम शिल्लक आहे.  सध्याच्या कामांची गती आणि शिल्लक कामे लक्षात घेतली तर 2025 पर्यंतही महामार्ग पूर्ण होईल, असे सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे आता पुन्हा नव्या वर्षात महामार्गासाठी ‘तारीख पे तारीख’चा खेळ पहावयास मिळणार आहे.

Advertisement

महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा 450 किलोमीटरचा महामार्ग आहे. यामध्ये इंदापूर ते झाराप अशा 366 ा†कलोमीटरच्या चौपदरीकरणाच्या कामाला 2013 रोजी प्रशासकीय मंजुरी ा†मळाली. प्रारंभी 11 हजार 745 कोटी ऊपयांची तरतूद यासाठी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात 2014 रोजी भूसंपादनाला सुऊवात झाली. प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश 2017-18मध्ये देण्यात आले. काम वेगाने व्हावे या हेतूने 35 ते 40 कि.मी. अंतराचे टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली. रायगड, रत्ना†गरी आा†ण सिंधुदुर्ग या तीन ा†जह्यात कशेडी बोगदा सोडून एकूण दहा टप्प्यांमध्ये काम सुरू करण्यात आले.

Advertisement

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यांचा विचार केला तर एकूण अकरा टप्यांपैकी वाकेड ते तळगांव, पुढे कळमट आणि झाराप, खेड असे चार टप्पे पूर्णत्वास गेलेले आहेत. मोठ्या अडचणी आणि शिल्लक काम हे रायगडमध्ये अधिक आहे. पळस्पे ते कासू या 42 कि.मी.मध्ये एक मार्गिका पूर्णत्वास गेली असून दुसरी केवळ 8 कि.मी. इतकीच झाली आहे. कासू ते इंदापूर काहीच काम झालेले नाही. पुढे माणगांव, इंदापूर येथील बायपास मार्ग रखडले आहेत.  मुख्यत: याच ठिकाणी वाहतूककोंडीला अधिक सामोरे जावे लागते. येथे अजूनही भूसंपादनही पूर्णत्वास गेलेले नाही. ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत भूसंपादनाचे काम तत्परतेने हाती घेतले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र गेल्या पाच महिन्यात इंचभर जागेचेही संपादन झालेले नाही. त्यामुळे चौपदरीकरणाची खरी अडचण ही रायगडमध्ये अधिक आहे.

एकीकडे राजापूर, खेडसह सिंधुदुर्गमधील दोन्ही टप्पे पूर्ण होत आलेले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात कामांचा खरा खोळंबा हा रत्नागिरी, संगमेश्वरमधील टप्प्यात अधिक झालेला आहे. या संपूर्ण महामार्ग चौपदरीकरणात सर्वात पिछाडीवर संगमेश्वरमधील आरवली ते तळेकांटे आणि पुढे वाकेड हे दोन टप्पे आहेत. गेल्या सात वर्षात या दोन्ही टप्प्यांमध्ये जेमतेम काम झालेले आहे. सिंधुदुर्गसह अन्य भागात चौपदरीकरणातील सुशोभिकरणाची झाडेही उगवली तरी संगमेश्वर टप्प्यात अजून पहिलीच झाडे तोडायची शिल्लक आहेत. कंत्राटदार कंपन्याही वारंवार बदलत गेल्याने तेथे ही परिस्थिती ओढवली आहे.

 गणेशोत्सवानंतर महामार्गाकडे दुर्लक्ष

कोकणात चौपदरीकरणाला सहा वर्षापूर्वी सुरूवात झाली. मात्र अजूनही कोकणातील महामार्गाचे चौपदरीकरण पूर्णच नव्हे तर त्याच्या अर्ध्यावरही होताना दिसत नाही. चौपदरीकरण रखडण्याची अनेक कारणे आहेत. यावर्षी गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्ग पाहणीचे तब्बल नऊ दौरे केले. मात्र या दौऱ्यातून काहीच साधले गेले नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. यातून ना कामांना गती मिळाली, ना चौपदरीकरणाला चालना मिळाली. आता तर त्या महामार्गाकडे कुणाचे लक्षच नसल्यासारखी स्थिती आहे. स्थानिक आमदार, खासदार, तर महामार्गकडे जणू पाठ फिरवूनच बसले आहेत. प्रत्येक टप्प्यात सुरू असलेली कामे ही धिम्या गतीने चालली आहेत. रायगडमध्ये जनआक्रोश समिती वेगवेगळ्या माध्यमातून स्थानिकांना घेऊन आंदोलन करत आहेत. गेल्याच आठवड्यात कासू येथे उपोषणही करण्यात आले. रायगडमध्ये आंदोलनात्मक पवित्रा घेऊनही चौपदरीकरणाला गती मात्र मिळू शकलेली नाही.

 पुलांची कामे अर्धवट

महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील काही पुलांच्या बांधकामांना दिली गेलेली मुदत यापूर्वीच टळून गेली आहे. तरीही कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत. चिपळुणात तब्बल 1.835 कि.मी. लांबीचा, 25 मीटर रूंदीचा आणि 46 पिलरवर उभा राहणारा उ•ाणपूल कोकणातील सर्वाधिक लांबीचा उ•ाणपूल असणार आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या पुलाचा काही भाग काम सुरू असतानाच कोसळल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. आता तर या पूल उभारणीतील त्रुटी समोर आल्यानंतर त्याचे डिझाईन बदलण्याच्या आणि दुसरी कंत्राटदार कंपनी शोधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाले झाले तर हा पूल आणखी दोन ते अडीच वर्षे रखडण्याची चिन्हे आहेत.

सर्वच टप्प्यांची मुदत 22 मध्येच टळून गेली

इंदापूर ते झाराप या 366 कि.मी.च्या महामार्ग चौपदरीकरणातील अकराही टप्प्यांच्या कामांना 2017मध्ये सुरूवात झाली. त्यानंतर अलीकडची दीड, दोन वर्षे कोरोना लॉकडॉऊनमध्ये गेली. मात्र कामे संथगतीने झाल्यानंतर प्रत्येक कंत्राटदार कंपनीला पुढील कामासाठी मुदतवाढ मिळाली. त्याही कालावधीत ते काम पूर्ण करू शकलेले नाहीत. आता तर बहुतांशी कंत्राटदार कंपन्यांना दिलेली मुदत केव्हाच संपून गेलेली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांची स्थिती पाहता यांना आणखी मुदतवाढ देऊनही लवकर काम पूर्ण होतील याची शाश्वती नाही.

 कशेडी बोगद्यासाठी आता नवा मुहूर्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी घाटाला पर्याय म्हणून काढण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांची खोदाईची कामे गतवर्षीच पूर्ण करत संपूर्ण 9 कि. मी. अंतरातील पूल, मोऱ्या यांचीही कामे मार्गी लागली होती.  केवळ रस्ते कॉंक्रिटीकरण शिल्लक राहिले आहे. तब्बल 441 कोटी खर्चाच्या या टप्प्यातील तीनपदरी रस्ता आणि त्यातील काही पुलांची अर्धवट कामे यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात 18 दिवस एक मार्गिका खुली करून ती नंतर बंद करण्यात आली. 2023मध्ये हा बोगदा वाहतुकीस पूर्णपणे खुला होईल, असे सांगितले जात होते. मात्र हेही वर्ष निघून गेल्याने आता 2024ची वाट पहावी लागणार आहे. नव वर्ष उजाडलं की महामार्गाच्या प्रश्नावर पूर्णत्वाची नवीन तारीख देऊन मोकळे होतात. तारीख पे तारीख हा आता नित्याचा खेळ झाला आहे.

राजेंद्र शिंदे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article