For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता पाण्यात मानवावर अंत्यसंस्कार

06:13 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता पाण्यात मानवावर अंत्यसंस्कार
Advertisement

कॅनडा, अमेरिकेनंतर आणखी एका देशाची तयारी

Advertisement

मृत्यू झाल्यावर संबंधिताच्या पार्थिवावर अग्निसंस्कार केले जातात किंवा पार्थिव दफन केले जाते. परंतु आता मृत्यूनंतर जलदाह संस्कारचा पर्याय असणार आहे. जलदाह संस्कारची तयारी ब्रिटनमध्ये सुरू आहे. ब्रिटनची सर्वात मोठी फ्यूनरल कंपनी को-ऑप फ्यूनरलकेयर याची तयारी करत आहे. जर ही प्रक्रिया यशस्वी ठरली तर ब्रिटनमध्ये  मृतदेहांवर पाण्यात अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ब्रिटनपूर्वी जलदाह संस्काराची ही प्रक्रिया अमेरिका, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेत अत्यंत लोकप्रिय आहे.

या प्रक्रियेत मृतदेह एका बायोडिग्रेडेबल पिशवीत ठेवला जातो, ज्याला दबावयुक्त पाणी आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइडसोबत एका कंटेनरमध्ये ठेवण्यात येते. शरीराच्या पेशी आणि वॉटर सोल्युशनमध्ये परिवर्तित होतात. हाडं, डेंटल ट्रान्सप्लांट आणि शरीराचे अन्य कठोर अवशेष क्षारयुक्त वॉटर सोल्युशनमध्ये सोडण्यात येतात. जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा या सामग्रीला छोट्या छोट्या भागांमध्ये बदलण्यात येते, यानंतर हाडं नरमं होतात आणि त्यांना सुकवून पांढरी भुकटी तयार केली जाते. यानंतर कुटुंबीयांना ती सुपूर्द केली जाते.

Advertisement

जलदाह संस्काराला हायड्रो दाह संस्कार, जैव दाह-संस्कार, क्षारीय जल-अपघटन देखील म्हटले जाते. ही प्रक्रिया पर्यावरणाच्या अनुकूल आहे, कारण यामुळे हवेत विषारी वायूचे उत्सर्जन होत नाही. तसेच पाणीही प्रदूषित होत नाही. तसेच याकरता कुठल्याही प्रकारच्या शवपेटीची आवश्यकता भासत नाही.

ब्रिटनमधील फ्यूनरलकेयर कंपनीने सरकारला स्वत:च्या योजनांविषयी कळविले आहे. तसेच आता केवळ मंजुरीची प्रतीक्षा केली जात आहे. जलदाह संस्कार अवैध नाही, परंतु कंपनीला ही प्रक्रिया पर्यावरण, सुरक्षा आणि आरोग्य नियमांचे पालन करत असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.