नोवा अॅग्रीटेकचा आयपीओ आज होणार खुला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोवा अॅग्रीटेक लिमिटेड कंपनीचा आयपीओ 23 जानेवारीला बाजारात खुला झाला आहे. या आयपीओसाठी 39-41 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे.
कंपनी आयपीओ अंतर्गत 144 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. 23 जानेवारीला खुला झालेला नोवा अॅग्री टेकचा आयपीओ 25 जानेवारी रोजी बंद होणार आहे.
आयपीओ अंतर्गत 112 कोटी रुपयांचे समभाग सादर केले जाणार आहेत. सदरच्या कंपनीचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर मंगळवार 30 जानेवारी रोजी सूचिबद्ध होणार असल्याची माहिती मिळते आहे.
गुंतवणूकदारांना एका
लॉटमध्ये 365 समभाग खरेदी करता येतील. सदरच्या आयपीओच्या सादरीकरणानंतर जमा झालेली रक्कम ही कारखाना स्थापण्यासोबतच सहाय्यक कंपनी नोवा अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासाठी वापरली जाणार आहे.
नोवा अॅग्रीटेक या संस्थेची स्थापना मे 2007 मध्ये हैदराबाद येथे करण्यात आली होती. यांची उत्पादने ही शेतकऱ्यांसाठी चांगले पीक घेण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.