For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुपवाडमध्ये अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक

05:48 PM Mar 27, 2025 IST | Radhika Patil
कुपवाडमध्ये अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक
Advertisement

कुपवाड :

Advertisement

कुपवाड एमआयडीसी तसेच तासगाव तालुका परिसरातून मोटरसायकलची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास कुपवाड पोलिसांनी पकडले. युवराज उर्फ महेश यशवंत म्हेत्रे (२५, रा. मराठी शाळेमागे, मणेराजुरी, ता. तासगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील चोरी केलेल्या २ लाख ३७हजार रुपये किंमतीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.

याबाबत माहिती अशी, बुधवारी सकाळी कुपवाड पोलिस ठाण्यातील कर्मचारी तानंग परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मोटरसायकल वरून तानंग बसस्टॉप समोरून एकजण भरधाव वेगाने जात होता. संशयावरून पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो तसाच वेगाने निघून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्याला ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली. 

Advertisement

युवराज म्हेत्रे याने कुपवाड एमआयडीसीतील एका कंपनीच्या पिछाडीस गेटजवळ पार्किंगमध्ये लावलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकीची (एम.एच.१०, डी. वाय.- ८१९६) चोरी केल्याची कबुली दिली. म्हेत्रे याने यापूर्वी तासगाव शहरातील दुचाकी (एम.एच.१०, बी. के. ४५०३) चोरी करून मानमोडी फाटा येथे एका पानपट्टी मागे लावली होती. अशा एकूण तीन मोटरसायकली कुपवाड पोलिसांनी जप्त दिली. 

Advertisement
Tags :

.