कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आसाममधील चकमकीत कुख्यात माओवादी ठार

06:18 AM Oct 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोक्राझारमध्ये अन्य साथीदारांचा शोध सुरू

Advertisement

वृत्तसंस्था /कोक्राझार

Advertisement

आसाममधील कोक्राझार जिह्यातील नादुरी येथे शुक्रवारी सकाळी पोलीस चकमकीत एका कुख्यात माओवाद्याला ठार मारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत मारला गेलेला संशयित एका माओवादी संघटनेशी संबंधित होता. यापूर्वी घडवण्यात आलेल्या अनेक रेल्वे बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा सहभाग होता. मृताचे नाव अपिल मुर्मू उर्फ रोहित मुर्मू (40) असे असून तो झारखंडचा रहिवासी आहे. मृत माओवाद्याच्या इतर साथीदारांना पकडण्यासाठी परिसरात अजूनही कारवाई सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कोक्राझार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुर्मू हा कोक्राझारमध्ये अलीकडेच झालेल्या रेल्वे ट्रॅक बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक होता. यापूर्वी तो झारखंडमध्ये अशाच प्रकारच्या रेल्वे बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी होता. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट केल्यानंतर मुर्मू  आसामला पळून गेला होता. झारखंडमध्ये तो रोहित मुर्मू म्हणून ओळखला जात होता, तर आसाममध्ये तो अपिल मुर्मू हे नाव वापरत होता. तो आसामच्या कोक्राझार जिह्यातील कचुगाव येथे वास्तव्यास होता. मुर्मूचे झारखंड आणि आसाम दोन्ही ठिकाणी संबंध होते. तो पूर्वी ‘एनएसएलए’चा (नॅशनल लिबरेशन आर्मी) सदस्य होता. जेव्हा या संघटनेने आत्मसमर्पण केले तेव्हा मुर्मूने आत्मसमर्पण करण्यास नकार देत एक वेगळा गट स्थापन केला होता. सदर गटाचा कमांडर बनल्यानंतर त्याने माओवादी गटांशी संबंध प्रस्थापित करत आपले दहशतवादी नेटवर्क वाढवले होते.

शस्त्रास्त्रांसह महत्त्वाचे दस्तावेज हाती

झारखंड पोलिसांचे एक पथक अलीकडेच त्याचा माग काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी आसामला गेले. कारवाईदरम्यान, पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणावरून एक पिस्तूल, एक ग्रेनेड, एक मतदार ओळखपत्र आणि झारखंडमधून जारी केलेले आधारकार्ड जप्त केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article