कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुख्यात गुन्हेगार राजया वळवीला अटक

05:10 PM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नंदुरबार पोलिसांना गोवा पोलिसांचे सहकार्य : महाराष्ट्रातील अनेक गुह्यांमध्ये संशयिताचा सहभाग

Advertisement

पणजी : महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी अनेक गुन्हे करून पलायन केलेला कुख्यात संशयित आरोपी राजया ऊर्फ नागेश दमन्या वळवी याला गोव्यातील बागा येथील एका अतिथीगृहातून अटक करण्यात आली. महाराष्ट्रातील नंदुरबार येथील पोलिसांचे पथक संशयित आरोपीच्या शोधात गोव्यात आल्यानंतर त्यांना कळंगुट पोलिसांनी सहकार्य केले. याबाबत माहिती अशी की, राजया ऊर्फ नागेश दमन्या वळवी (वय 27, रा. कात्री, अक्राणी, नंदुरबूर) याने महाराष्ट्रात अनेक गुन्हे केलेले आहेत. त्याच्यावर कलम 457, 380, कलम 34 अंतर्गत गुन्हा क्रमांक 113/2022, कलम 380, 457 अंतर्गत 92/2022, कलम 185, 177 अंतर्गत 50/2022, कलम 457, 380 अंतर्गत 115/2022,  कलम 457, 380 अंतर्गत  34 अंतर्गत  5. क्रमांक 278/2024 कलम 118(2), 126(2) कलम 3(5) अंतर्गत बीएनएस, 35/2025 कलम 65 ई महाराष्ट्र दारू बंदी कलम, 54/2025 कलम 109, 351(3) कलम 3(5) अंतर्गत त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.  बीएनएस कायद्यानुसार संशयित आरोपीला येथील एका अतिथीगृहात शोधण्यात आले. तो मिळताच पोलिस उपनिरीक्षक हरीश वायंगणकर यांनी त्याला अटक केली. या पथकात कळंगुट पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर, पोलिस कॉन्स्टेबल विजय नाईक, भगवान पालयेकर, सिद्धेश नाईक, गौरव चोडणकर, रोहन नाईक, राजन चंदगडकर आणि नितेश साळगावकर यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आरोपीला बीएनएसएसच्या कलम 35 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article