For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रायने मागविल्या स्पेक्ट्रम बँडबाबत सूचना

06:48 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रायने मागविल्या स्पेक्ट्रम बँडबाबत सूचना
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने गुरुवारी विविध पक्षांकडून मोबाईल सेवांसाठी तीन नवीन स्पेक्ट्रम बँड 37-37.5 जीएचझेड, 37.5-40 जीएचझेड आणि 42.5-43.5 जीएचझेड, लिलाव करण्याबाबत सूचना मागवल्या आहेत. या रेडिओ लहरींच्या किंमती, वैधता आणि पेमेंट अटींशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी नियामकाने एक सल्लापत्र जारी केले आहे.

ही पहिलीच वेळ आहे की 37-37.5  जीएचझेड, 37.5-40 जीएचझेड  आणि 42.5-43.5 जीएचझेडचे तीन स्पेक्ट्रम बँड लिलावासाठी ठेवण्यात आले आहेत. या प्रस्तावामुळे भविष्यातील 5जी सेवांसाठी 4,000 एमएचझेड स्पेक्ट्रम उपलब्ध होईल.

Advertisement

हे ब्लॉक्स 800 एमएचझेड, 900 एमएचझेड, 1,800 एमएचझेड, 2,100 एमएचझेड, 2,300 एमएचझेड,2,500 एमएचझेड, 3,300एमएचझेड, आणि 26 जीएचझेड पेक्षा वेगळे आहेत. 6 जून रोजी होणाऱ्या स्पेक्ट्रम लिलावात हे ब्लॉक्स ठेवण्यात येणार आहेत.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने आयएमटी (इंटरनॅशनल मोबाइल टेलिफोनी) साठी ओळखल्या गेलेल्या 37-37.5 जीएचझेड, 37.5-40जीएचझेड आणि 42.5-43.5 जीएचझेड बँडमधील स्पेक्ट्रमच्या लिलावाबद्दल सल्लामसलत पेपर जारी केला आहे.

Advertisement
Tags :

.