For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोमॅटोला जीएसटीची नोटीस

06:34 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
झोमॅटोला जीएसटीची नोटीस
Advertisement

जवळपास 8.57 कोटींची नोटीस : गुजरात कर विभागाची नोटीस

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

खाद्यपदार्थ पुरवठा करणारी कंपनी झोमॅटोला 8.57 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या किंमतीची जीएसटीची नोटीस ही गुजरात राज्य कर उपायुक्तांनी 2018-19 या आर्थिक वर्षांच्या संदर्भात दिली आहे. झोमॅटोने नियामक फायलिंगमध्ये, ऑर्डरमध्ये कंपनीला 4,11,68,860 रुपयांचा दंडही भरण्यास सांगितले आहे. एकूण रक्कम ही 8,57,77,696 रुपये आहे. जीएसटी रिटर्न आणि अकाउंट्सच्या ऑडिटनंतर हा आदेश देण्यात आला आहे.

Advertisement

 कंपनीने कमी जीएसटी भरला

झोमॅटोने सांगितले की, जीएसटी आदेश सीजीएसटी कायदा 2017 आणि जीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 73 अंतर्गत जारी करण्यात आला आहे. आदेशात म्हटले आहे की ऑडिटमध्ये असे आढळून आले की कंपनीने अतिरिक्त इनपुट टॅक्स क्रेडिट आणि कमी भरलेला जीएसटी घेतला.

झोमॅटो आदेशाला आव्हान देईल

झोमॅटोचे म्हणणे आहे की कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना त्यांनी संबंधित कागदपत्रे, परिपत्रके इत्यादी सर्व मुद्यांवर स्पष्टीकरण दिले होते. मात्र आदेश काढताना अधिकाऱ्यांनी त्यांचा पूर्ण विचार केला नसल्याचे दिसून येत आहे. या आदेशाला योग्यपणे आव्हान देणार असल्याचे झोमॅटोने पुढे म्हटले आहे. झोमॅटोचे समभाग शुक्रवारी (15 मार्च) 4.68 टक्के वाढीसह 159.90 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केटकॅप 1.39 लाख कोटी रुपये आहे. गेल्या एका वर्षात या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना 191.26 टक्के परतावा दिला आहे.

Advertisement
Tags :

.