नथिंगचा नवा फोन 3 ए लाइट होणार लाँच
50 एमपी कॅमेरा, 5000 एमएएचची बॅटरी, 33 डब्ल्यूचा वायर्ड चार्जर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नथिंग कंपनीचा नवा ‘फोन 3 ए लाइट’ याच महिन्यात 27 तारखेला भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे. सदरच्या फोनमध्ये अनेकविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. सदरचा स्मार्टफोन जागतिक स्तरावर मागच्या महिन्याच्या अखेरीस लाँच करण्यात आला आहे. आता तो भारतात याच महिन्यात लाँच होत आहे. जागतिक स्तरावरच्या फोनमध्ये व भारतात लाँच होणाऱ्या फोनमध्ये काही बदल आहेत का याचा खुलासा झालेला नाही. सदरचा फोन 6.77 इंचाच्या फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्लेसह येणार असून मीडियाटेक डायमनसिटी 7300 चा प्रोसेसर असेल.
स्टोरेज, कॅमेरा
8 जीबी रॅम व 256 जीबीचे स्टोरेज यामध्ये दिले जाईल. यात मुख्य कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा तर सोबत 8 एमपीचा अल्ट्रावाइड व 2 एमपीचा मॅक्रो युनिटचा तर 16 एमपीचा शुटर कॅमेरा दिला गेला आहे. 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असून 33 डब्ल्यूचा वायर्ड चार्जर देण्यात आला आहे. यात अॅप लॉकर दिलेला आहे.
वैशिष्ट्यो
डिस्प्ले : 6.77 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
प्रोसेसर : मीडियाटेक डायमनसिटी 7300 प्रो
रॅम : 8 जीबी
स्टोरेज : 256 जीबी
रिअल कॅमेरा : 50 एमपी
फ्रंट कॅमेरा : 16 एमपी
बॅटरी : 5000 एमएएच
चार्जिंग :33 डब्ल्यू वायर्ड
ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉइड 15 बेसड नथिंग ओएस 3.5