महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवृत्तीची नाही तर आयुष्याचीच अखेर

11:07 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फार्मसिस्टच्या दुर्दैवी मृत्युमुळे हळहळ व्यक्त : अखंड 34 वर्षे औषधालयात सेवा

Advertisement

बेळगाव : अखंड 34 वर्षे औषधालयात सेवा बजावून रुग्णाला वेळच्यावेळी औषधे मिळावीत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शुक्रवार दि. 31 रोजी त्यांच्या सेवेचा अखेरचा दिवस. परंतु दुर्दैवाने गुरुवार हा त्यांच्या आयुष्याचाच शेवटचा दिवस ठरला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, विरुपाक्षप्पा कोट्य्राप्पा हर्लापूर (वय 60) हे सिव्हिल हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये चीफ डेप्युटी फार्मसिस्ट म्हणून कार्यरत होते. राज्यातील विविध सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केले. गेल्या तीन वर्षांपासून पदोन्नतीवर ते सिव्हिल हॉस्पिटलच्या फार्मसी विभागात कार्यरत होते. ते मूळचे गदग जिल्ह्याचे, सध्या धारवाड येथे स्थायिक झाले होते. रोज धारवाडहून बेळगावला ये-जा करून ते आपली सेवा बजावत होते. शुक्रवार दि. 31 मे रोजी सरकारी सेवेतील शेवटचा दिवस म्हणून गुरुवारी त्यांनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सहकाऱ्यांनाही भेटून उद्या पुन्हा भेटूया, असे सांगून ते सिव्हिल हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते.

Advertisement

त्यावेळी मेडिकल वॉर्ड प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कारची धडक बसून विरुपाक्षप्पा गंभीर जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विरुपाक्षप्पा यांना तातडीने ते काम करीत असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. लागलीच पुढील उपचारासाठी त्यांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच वाहतूक विभागाचे एसीपी पवन एन., वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगेरी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सायंकाळी विरुपाक्षप्पा यांच्या मृतदेहावर खासगी इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. निष्ठेने सेवा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या सेवेच्या शेवटच्या दिवसापूर्वी अशी अखेर व्हावी याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article