महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तराखंड बोगद्याशी संबंध नाही !

06:17 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

उत्तराखंड बोगद्याच्या निर्मितीशी आपल्या कोणत्याही कंपनीचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण अदानी उद्योगसमूहाने केले आहे. काही जणांनी अत्यंत कुहेतूने या बोगद्याच्या निर्मितीचे कार्य अदानी उद्येागसमूहाकडून केली जात असल्याचा अपप्रचार चालवला आहे. मात्र, अशा धादांत खोट्या प्रचारापासून लोकांनी सावध रहावे, असे आवाहन या समूहाने सोमवारी केले आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा येथे एका निर्माणाधीन बोगद्यामध्ये दरड कोसळल्याने बाहेर येण्याचा मार्ग बंद होऊन 41 कामगार अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न गेले दोन आठवडे सातत्याने केले जात आहेत. काही लोकांनी या बोगद्याच्या निर्मितीचा संबंध अदानी समूहाशी जोडून या समूहाविरोधात अपप्रचार चालविला आहे, असा आरोप समूहाने केला आहे. या अपप्रचारामागे मोठे कारस्थान असून देशाची प्रतिमा मलीन करण्याची ही चाल आहे. या बोगद्याच्या निर्माणकार्यात आमच्या उद्योगसमूहाचा दूरान्वयेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. तरीही, काही विघ्नसंतोषी लोकांकडून उद्योगसमूहाची बदनामी करण्यासाठी कुभांड रचल्याची टीका समूहाकडून करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article