महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजर्षी शाहू महाराजांचा फोटो न छापणे हे षडयंत्र

12:30 PM Dec 06, 2024 IST | Radhika Patil
Not printing Rajarshi Shahu Maharaj's photo is a conspiracy
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

सरकारकडून शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार संपविण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो जाणीवपुर्वक जाहिरातीमधून वगळण्यात आला आहे. सरकार विकास कामांसोबतच विचारांवरही चालत असून, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार संपविण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला.

Advertisement

महायुती सरकारने जाहिरातीमध्ये गुरुवारी राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो वगळला आहे. याच्या निषेधार्थ गुरुवारी इंडिया आघाडी व समस्त शाहू प्रेमींच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळ येथे आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांचे विचार जाणीवपुर्वक संपविण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. 125 वर्षापूर्वी शाहू महाराजांना असाच त्रास देण्याचे काम तथाकथित लोकांनी केले होते. मात्र यातून संघर्षकरुन महाराजांनी बहुजनांचे काम करत लोकराजा झाले. कोल्हापूर हे पुरोगामी शहर असून, महाराजांचे विचार कधीच संपणार नाही. असा प्रयत्न करणाऱ्या सरकारला आगामी काळात उत्तर देवू असेही खासदार शाहू महाराज यांनी सांगितले. तसेच सरकारने शाहू महाराज यांचा फोटो न छापण्याची घोडचूक केली असून, याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमठतील असा इशाराही दिला. या प्रकाराबद्दल सरकारने माफी मागावी अशी मागणीही खासदार शाहू छत्रपती यांनी केली.

माजी नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो न छापण्याची घोडचूक सरकारने केली आहे. शाहू महाराजांनी मानवतेची धोरणे राबविली. मात्र त्या धोरणांचा विरोध करण्याचे काम सुरु आहे. केवळ निवडणूकीपुरते शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाचा वापर करणे सरकारकडून सुरु आहे. सरकारने हा प्रयोग केला आहे, आगामी काळात शाहू महाराजांसोबतच फुले, आंबेडकर यांचेही फोटो वगळण्याचे पाप सरकार करेल. याला विरोध करुन ही प्रवृत्ती थोपवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कॉमन मॅन संघटनचे बाबा इंदुलकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले आहे. मात्र या विषयावर कोल्हापूर जिह्यातील 10 आमदारही गप्प बसले. या आमदारांचे शाहू महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचा आरोपही इंदुलकर यांनी केला.

यावेळी शिवसेनेचे विजय देवणे, माजी महापौर आर. के. पोवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, काँग्रेसचे शहरअध्यक्ष सचिन चव्हाण, शिवाजीराव परुळेकर, भारती पवार, अनिल घाटगे यांच्यासह समस्त शाहू प्रेमी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article