For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरची ईश्वरी टी-20 वर्ल्डकपमध्ये

12:32 PM Dec 25, 2024 IST | Radhika Patil
कोल्हापूरची ईश्वरी टी 20 वर्ल्डकपमध्ये
Kolhapur's Ishwari in the T20 World Cup
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

कोल्हापुरातील  साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची ऑल राऊंडर क्रिकेटर ईश्वरी मोरेश्वर अवसरेने आपल्या बलबूत्यावर क्वालालंपूरात (मलेशिया) जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप 19 वर्षाखालील मुलींच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवली आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डच्या (बीसीसीआय) निवड समितीने वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय मुलींच्या संघात 16 वर्षीय ईश्वरीला स्थान दिले आहे. कर्ल्डकपच्यानिमित्ताने ईश्वरी ही गेल्या वर्षभरात सलग तिसऱ्यांदा भारतीय 19 वर्षाखालील मुलींच्या संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणार आहे.

तीनच दिवसांपूर्वी मलेशिया 19 वर्षाखालील आशिया-कप मुलींची क्रिकेट स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. बांगलादेश विऊद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघातून प्रतिनिधीत्व केलेल्या ईश्वरीने महत्वपूर्ण खेळाडूचा कॅच झेलून भारतीय संघाला अजिंक्यपदी विराजमान करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. ईश्वरीने राष्ट्रीय 19 वर्षाखालील मुलींच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेबरोबरच राष्ट्रीय पातळीवरील चॅलेंजर ट्रॉफी 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेतही महाराष्ट्र संघातून प्रतिनिधीत्व करताना उत्कृष्ट फलंदाजी कऊन आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. तिच्याकडील फलंदाजीच्या कौशल्याला दाद देत बीसीसीआयच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या इंटरनॅशनल ट्रॅग्युलर सिरीज 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलऊंडर ईश्वरीला भारतीय ब संघात स्थान दिले. याही स्पर्धेत तिने उत्कृष्ट फलंदाजी कऊन दाखवली होती. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन बीसीसीआयच्या निवड समितीने आता जानेवारी महिन्यात क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात तिला स्थान दिले आहे.

Advertisement

                                           मास्टर ब्लास्टरकडून टिप्स

पुण्यात 2018 साली क्रिकेट टॅलेंट हंट शिबिर झाले होते. या शिबिरात ईश्वरी सहभागी झाली होती. त्यावेळी ती फक्त 10 वर्षाची होती. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी क्रिकेटचा देव समजला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्यासह भारतीय संघाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी, केदार जाधव आला होता. त्यांनी ईश्वरीची फलंदाजी पाहिली होती. फलंदाजीवर प्रभावीत झालेल्या सचिन तेंडूलकरने तर चक्क ईश्वरीची भेटच घेतली. तिच्याशी मनमोकळेपणा गप्पा मारल्या. फलंदाजीच्या टिप्सही दिल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण फलंदाजी करताना खेळपट्टीवरील क्रिजमध्ये कसे उभे राहण्याचे (टान्स) याचे प्रात्याक्षिकही तेंडूलकरने ईश्वरीला दाखवले. हे प्रात्याक्षिक डोळ्यात साठवून ईश्वरीने क्रिजवरील टान्सचा रोजच्या रोज सराव कऊन तो अंगवळणी कऊन घेतला. इतकेच नव्हे तर ईश्वर आजही तेंडुलकरांनी शिकवलेल्या टान्समध्ये खेळपट्टीवरील क्रिजमध्ये उभी राहून फलंदाजी करत आहे.

Advertisement
Tags :

.