महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मोहब्बत’ नव्हे ‘धमकीचे दुकान’

05:10 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कमलनाथांची प्रशासनाला धमकी : भाजपकडून काँग्रेसवर टीका

Advertisement

मध्यप्रदेशात निवडणुकीपूर्वी राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्व पक्ष परस्परांच्या त्रुटी आणि चुका चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान कमलनाथ यांच्या एका वक्तव्यावरुन  भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसला घेरले आहे. एका प्रचारसभेत बोलताना कमलनाथ हे अधिकाऱ्यांना जाहीरपणे धमकाविताना दिसून आले होते.

Advertisement

काँग्रेस पक्ष हा ‘मोहब्बत की दुकान’ आहे का ‘धमकी की दुकान’ आहे? यापूर्वी देखील कमलनाथ यांनी जाहीर स्वरुपात अधिकाऱ्यांना अनेकवेळा धमकाविले असल्याचा दावा पूनावाला यांनी केला आहे. ‘अधिकाऱ्यांनी कारवाई रोखावी, अन्यथा आम्ही सत्तेवर आल्यास तुम्ही काय करणार’ असे कमलनाथ यांनी म्हटले होते. काँग्रेस पक्ष किती अहंकारी आहे आणि त्याची मानसिकता कशी आहे हे कमलनाथ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेस अशाप्रकारे वागत असल्यास सत्तेवर आल्यास काय करेल याचा विचार केला जावा. काँग्रेस ही मोहब्बत की नव्हे तर धमकीचे दुकान ठरल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे.

मध्यप्रदेशात स्वत:चा होणारा पराभव पाहून काँग्रेस बिथरला आहे. याचमुळे अशाप्रकारच्या धमक्या देत आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्या वक्तव्याची दखल घेत त्वरित कारवाई करावी.  काँग्रेसमध्ये कपडे फाडण्याचे राजकारण सुरू आहे. जनताच आपले कपडे फाडणार हे काँग्रेसला कळून चुकल्याने त्या पक्षाचे नेते  अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची टीका पूनावाला यांनी केली आहे.

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी एका सभेदरम्यान निवाडी जिल्हा प्रशासनाला धमकी दिली होती. मी पृथ्वीपूर आणि निवाडीच्या प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही जे काही करत आहात, त्याबद्दल निर्णय जनता तसेच माझ्याकडून घेतला जाणार आहे. कुणालाही सोडणार नाही, केवळ 6 दिवस शिल्लक राहिले आहेत, जे करायचे ते करा, पुढील 5 वर्षे तुम्हाला काढायची आहेत असे कमलनाथ यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article