महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेसाठी इच्छुक नाही : तवडकर

11:52 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये आपल्या नावाचा जरी विचार झाला असला तरीदेखील आपल्याला गोवा सोडून कुठेही जायचे नसल्याने आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही, असे स्पष्ट निवेदन सभापती रमेश तवडकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केले. तवडकर म्हणाले, आपण गोव्यामध्ये जी काही कामे करीत आहे, त्याला जनतेचा मिळणारा प्रतिसाद आणि जनतेच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करण्यासाठी आपल्या मतदारसंघांमध्ये आपण विशेष लक्ष देऊन आहे. जनतेचा आपल्यावर विश्वास असल्यामुळे आणि जनतेने आपल्यावर मतदानातून विश्वास निर्माण केलेला असल्यामुळे आपण इथेच राहून जनतेची सेवा करू इच्छित आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या नावाचा जरी उमेदवारीसाठी विचार झाला असेल किंवा पक्षांतर्गत झालेल्या सर्वेक्षणात आपल्या नावाला मिळालेला प्रतिसाद याने आपण भारावून गेलो आहे. मात्र आपल्याला लोकसभा निवडणुकीत रस नाही. आपण निवडणूक लढवू इच्छित नाही. आपण ही माहिती पक्षाच्या विविध पातळीवरील नेत्यांना या अगोदरच दिली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article