For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंचतारांकित नव्हे, सामान्यांसाठी गृहप्रकल्प

12:31 PM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंचतारांकित नव्हे  सामान्यांसाठी गृहप्रकल्प
Advertisement

नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : सदर जमीन स्वत:ची असल्याचेही केले स्पष्ट,व्हिडिओ व्हायरल झाल्याने सांखळीत खळबळ

Advertisement

पणजी : कारापूर सांखळी येथे 4.5 लाख चौ. मी. क्षेत्रात भव्य पंचतारांकित प्रकल्प येणार असून त्यासाठी कारापूर सर्वण ग्रामपंचायतीने फाईल हाती येताच अवघ्या 24 तासांमध्ये ना हरकत दाखला दिल्याने बरीच खळबळ माजली आहे. तथापि, या प्रकरणी नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी सदर जमीन आपल्या मालकीची असून पूर्णत: खडकाळ असल्याचे स्पष्ट केले आहे. तिथे पंचतारांकित नव्हे, तर सर्वसामान्य जनतेला परवडतील, अशी घरे उभारली जाणार आहेत. मंगलप्रसाद लोढा या नेत्याने तथा लोढा कंपनीने ही जागा घेतलेली आहे, त्यामुळे कोणीही अजिबात बिथऊन जाण्याची गरज नसल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले. कारापूर - सर्वण ग्रामपंचायत क्षेत्रात आमची वडिलोपार्जित व पूर्णत: खडकाळ तसेच पडून राहिलेली जागा आपण विकलेली आहे. त्या जागी गृहबांधणी प्रकल्प येतोय. मात्र याबाबत चुकीचा व्हिडिओ तयार कऊन त्याद्वारे अत्यंत चुकीची माहिती देण्यात आल्याचे नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी पुढे सांगितले. दै. ‘तरुण भारत’शी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, आपण जी जागा विकलेली आहे ती प्रॉफिट शेरींगमध्ये आहे. कोणाचीही त्यात फसवणूक होणार नाही. त्या ठिकाणी पॅसिनो व पंच तारांकित हॉटेल प्रकल्प आणतोय, असे तुम्हाला कोणी सांगितले? कोणीतरी बोगस व्हिडिओ तयार करीत असतील, तर आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले.

जागा घरे उभारण्यासाठीच वापरणार

Advertisement

कारापूर येथील 4 लाख 50 हजार चौ. मी. जमिनीमध्ये लोढा कंपनीतर्फे भूखंड विकसित केले जातील. ज्यामध्ये छोटे छोटे बंगले तथा घरे उभारली जातील. सांखळी - डिचोली सारख्या ठिकाणी कोण पंचतारांकित हॉटेल उभारणार? त्या ठिकाणी पॅसिनो उभारला जाणार ही चुकीची माहिती आहे. आम्ही ही जागा निव्वळ गृहबांधणी प्रकल्पासाठी वापरणार आहोत, असे राणे म्हणाले.

आक्षेप घेण्यास न्यायालयात जावे

या जमिनीत झाडे नाहीत, ती केवळ डोंगराळ व खडकाळ अशीच जमीन आहे. माझी जमीन विकण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, तेव्हा त्याला कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. जर कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. मात्र वाट्टेल ते आरोप आपण सहन कऊन घेणार नाही, असा इशारा देखील देण्यास ते विसरले नाहीत.

मंदिरात प्रमाण होण्यास राजी : सचिव

या प्रकरणी सरपंच तन्वी सावंत तसेच पंचायत सचिव महादेव सावंत यांनी सांगितले की या प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. आम्ही कोणाकडूनही कोणताही लाभ घेतलेला नाही. गरज पडल्यास कोणत्याही मंदिरात जाऊन देवासमोर शपथ घेण्यास तयार आहोत असे ठासून सांगितले. जो काही निर्णय होईल तो कायदेशीर बाबींवऊनच होईल. आम्हाला या प्रकरणात अकारण कोणी गोवू नये, असे पंचायत सचिव सावंत म्हणाले. या प्रकरणातून नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्यावर सोशल मीडियातून टीका सुऊ झाल्यानंतर विश्वजित राणे यांनी प्रथमच स्पष्टीकरण देताना अनेक सोयी सुविधा आल्यानंतर जागेला देखील प्रचंड मागणी येते. त्यामुळे असे प्रकल्प आल्यानंतर सर्वांनाच त्याचा लाभ होईल, असे ते म्हणाले व असे विकास प्रकल्प थांबविता येणार नाहीत, असे विश्वजित राणे पुढे म्हणाले.

प्रकरणाचा अभ्यास करु द्या

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे हे प्रकरण पोहोचलेले आहे. त्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. सोशल मीडियावऊन माहिती उघड झाल्याने अनेकांनी त्यांना प्रश्न केले असता आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास कऊ द्या, असे ते उत्तरले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राजीनामा देणार, पण भ्रष्टाचार करणार नाही : सरपंच

कारापूर ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला फाईल हाती येताच 24 तासात परवानगी दिल्यामुळे पंचायत सदस्य व सरपंचांवर सोशल मीडियातून गंभीर टीका होत आहे. कारापूरच्या सरपंच तन्वी सावंत यांनी सांगितले की, नगरनियोजन खात्याकडून या प्रकल्पाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही फाईल हाती आल्यानंतर हंगामी स्वऊपाचा ना हरकत दाखला दिला असला तरी हा निर्णय अंतिम नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या ग्रामसभेसमोर नियमानुसार प्रस्ताव ठेवणार आहोत. ग्रामसभेची मान्यता मिळाली तर पंचायत या प्रकल्पाला परवानगी देईल. आपण कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. आपल्यासाठी जनता सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे राजीनामा देण्याची पाळी आली तर राजीनामा देईन परंतु, कोणाच्याही दबावाखाली येणार नाही, असे त्या म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.