महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘लहर’ नाही, केवळ ‘जहर’

06:35 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा समाजामध्ये फूट पाडणारी आहे. ते हिंदू-मुस्लीम मतभेद निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. त्यांच्या भाषेत कोणतीही ‘लहर’ (लाट) नाही. ‘जहर’ (वीष) मात्र भरपूर आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केली आहे. काँग्रेस ही निवडणूक घटना वाचविण्यासाठी लढत आहे. कारण घटना धोक्यात आहे, असा दावाही त्यांनी मंगळवारी केला.

Advertisement

विरोधी पक्षांना या निवडणुकीत चांगले वातावरण आहे. युवक, महिला, शेतकरी, कामगार, कर्मचारी, मागासवर्गीय हे सर्व समाजघटक भारतीय जनता पक्षासंबंधी नाराज आहेत. भारतीय जनता पक्षाने आपल्या 10 वर्षांच्या सत्तेत त्यांचा कोणताही लाभ करुन दिला नाही. या निवडणुकीत कोणाचीही लाट नाही. आम्ही ही निवडणूक जोमाने लढत आहोत. आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जनता आमच्या बाजूला आहे, असे अनेक दावे त्यांनी ‘एक्स’ वर केले.

Advertisement

Advertisement
Next Article