महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर इराक विद्यापीठाच्या वसतिगृहाला आग

06:57 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ एरबिल

Advertisement

उत्तर इराक विद्यापीठातील वसतिगृहात आग लागल्यामुळे जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला आहे. इराकच्या उत्तरेकडील शहर एरबिल येथील विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. सोरानच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, एरबिलच्या पूर्वेला असलेल्या सोरानमधील वसतिगृहाला आग लागली. हा भाग कुर्दिस्तान प्रांतात येतो. कुर्दिस्तानचे पंतप्रधान मसरूर बरझानी यांनी या घटनेबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे. सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

इराकमध्ये इमारतींना आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. इराकमध्ये आगीच्या घटना सामान्य आहेत. या घटना कोणत्याही देशात घडू शकत असल्या तरी इराकमध्ये अशा अपघातांमध्ये सर्वाधिक लोकांचा जीव जातो. तेथे अनेकदा सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बांधकामे केली जातात. याशिवाय वाहतूक क्षेत्रातही कमालीचा बेफिकीरपणा आहे. यावषी सप्टेंबरमध्ये उत्तर इराकच्या कराकस शहरातील एका फंक्शन हॉलमध्ये लग्नादरम्यान लागलेल्या आगीत सुमारे शंभर लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास केला असता इमारतीमध्ये इमर्जन्सी एक्झिट नसल्याचे समोर आले. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून ही इमारत बांधण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. इराकमधील सरकारी यंत्रणेची मूलभूत रचना सातत्याने कोलमडत आहे. अनेक दशकांपासून देश भ्रष्टाचाराने त्रस्त आहे. याचे परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article