उत्तर कोरियाकडून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाने सलग दुसऱया दिवशी क्षेपणास्त्र परीक्षण करत अमेरिकेला इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने शुक्रवारी क्षेपणास्त्र डागल्याचा खुलासा जपानने केला आहे. उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 15 हजार किलोमीटर असल्याने ते अमेरिकेपर्यंत पोहोचू शकते अशी माहिती जपानचे संरक्षणमंत्री यासुकाजू हमादा यांनी दिली आहे. उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र ओशिमा-ओशिमा बेटाच्या परिसरात कोसळले आहे. हा परिसर जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या अंतर्गत येतो. अमेरिकेने या क्षेपणास्त्र परीक्षणाची निंदा केली आहे. तर दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या विरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाने मागील दोन महिन्यांमध्ये 50 हून क्षेपणास्त्रs डागली आहेत.