रशियाकडून उत्तर कोरियाला मिळाली अत्याधुनिक क्षेपणास्त्र
दक्षिण कोरियाचा दावा
वृत्तसंस्था/ सोल
रशियाने उत्तर कोरियाला अत्याधुनिक क्षेपणास्त्रs तसेच अन्य शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे. याच्या बदल्यात उत्तर कोरियाने रशियात स्वत:चे सैनिक पाठविले आहेत. उत्तर कोरियाने युक्रेन विरोधातील युद्धात रशियाच्या मदतीसाठी सवतचे 10 हजारांहून अधिक सैनिक पाठविले आहेत अशी माहिती दक्षिण कोरियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
रशियाने उत्तर कोरियाची हवाई सुरक्षा प्रणाली मजबूत करण्यासाठी एंटी-एअर मिसाइल्स आणि अन्य उपकरणांचा पुरवठा केला आहे. रशियाने उत्तर कोरियाला आर्थिक मदत देखील केली आहे. रशिया स्वत:चे संवेदनशील आण्विक आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान उत्तर कोरियाला हस्तांतरित करू शकतो अशी भीती असल्याचे दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा संचालक शिन वोंसिक यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाने अलिकडेच रशियाला अतिरिक्त तोफ प्रणाली देखील पाठविली आहे. उत्तर कोरियाने ऑगस्ट 2023 पासूनआतापर्यंत रशियाला 13 हजारांहून अधिक कंटेनर तोफा, क्षेपणास्त्रs आणि अन्य पारंपरिक शस्त्रास्त्रs पाठविली आहेत. तर चालू आठवड्याच्या प्रारंभी उत्तर कोरिया आणि रशियाने उच्चस्तरीय चर्चेनंतर आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी एक नवा करार केला होता.