उत्तर कर्नाटक कच्छ कडवा पाटीदार सनातन समाजातर्फे सामुहिक विवाह सोहळा संपन्न
बेळगाव : उत्तर कर्नाटक कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज यांच्या वतीने समाजातील विवाहइछुक उपवर आणि वधुंचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. यंदाचे त्यांचे हे १६ वे वर्ष होते. ऑटोनगर येथील के एच सभाभवन येथे रविवार दि २ फेब्रुवारी रोजी हा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान नऊ नूतन जोडप्यांना यावेळी प्रत्येकी एकलाख पंचवीस हजार रुपयांची भेट देण्यात आली. यावेळी बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके तसेच केंद्रीय समाजाचे अध्यक्ष गोपालभाई भावानी यांची खास उपस्थिती लाभली. याप्रसंगी उत्तर कर्नाटक कच्छ कडवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष रतनसीभाई हलपानी, मंत्री हिम्मतभाई बादानी, आयोजन समितीचे अध्यक्ष जेठाभाई पोकार, महामंत्री जवेरीलाल दिवाणी, युवा मंडळाचे अध्यक्ष महेंद्र दिवाणी, महामंत्री अरुण दिवाणी , महिला मंडळाचे अध्यक्षा लाताबेन पोकार, मंत्री हिनाबेन सांखला यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा उद्देश हा केवळ वेळ आणि पैसा वाचविणे हा होता.