महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर गोवा जि. पं. बैठकीत गदारोळ

12:26 PM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी पायउतार होण्याची मागणी : अध्यक्षांचा ‘हम करे सो कायदा’ कारभारावर थेट टीका

Advertisement

पणजी : जिल्हा पंचायत सदस्यांची दर महिन्याला बैठक घेण्याचे बंधनकारक असताना उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे विद्यमान अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी मनमानी चालवून सदस्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सुमारे 85 दिवसानंतर काल घेण्यात आलेल्या या जिल्हा पंचायत सदस्यांच्या बैठकीत गदारोळ झाला. शाब्दिक बाचाबाची होऊन अध्यक्षांना सदस्यांनी धारेवर धरले. एका वर्षाच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष बनवले असताना तुम्ही हा कार्यकाळ संपूनही पदावर कसे काय राहता? असा खडा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बैठकीत गोंधळ माजला. पर्वरी येथील सचिवालयाच्या परिषदगृहात ही बैठक झाली. वडील श्रीपाद नाईक हे केंद्रात मंत्री असल्यामुळे त्याचा गैरफायदा सिद्धेश नाईक हे घेत आहेत, असा आरोप बैठकीत करण्यात आला. तसेच एकाच कुटुंबात दोन पदे कशी काय? अशी विचारणाही सदस्यांनी करून सिद्धेश नाईक यांना भांबावून सोडले.

Advertisement

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वापरा

15 व्या वित्त आयोगाचा निधी विकासकामांसाठी का वापरला जात नाही, अशी विचारणा सदस्यांनी अध्यक्षांना केली. केंद्राने सात कोटींचा निधी दिला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने हा निधी वापरात आणून प्रत्येक सदस्यांना विकासकामांसाठी त्याचा फायदा करून द्यावा, अशी जोरदार मागणी केली. मनमानी कारभारामुळे जिल्हा पंचायत प्रभागांचे विकासाअभावी मोठे नुकसान होत असल्याचेही सदस्यांनी ठासून सांगितले.

‘हम करे सो कायदा’ चालणार नाही

दर महिन्याला सदस्यांची बैठक घेणे बंधनकारक असतानाही तुम्ही ‘हम करे सो’ या पद्धतीने कारभार चालवत आहेत. हा प्रकार त्वरित थांबवावा आणि स्वत:हून अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे.

विकास समिती रद्द करावी

विद्यमान अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी जिल्हा पंचायत कार्यालयात आलेली पत्रे स्वत: सही केल्यानंतरच ती देण्यात यावी, असा नियम स्वत:च तयार केलेला आहे, यावरही सदस्यांनी आवाज उठवून हा नियम रद्दबातल करावा, अशी जोरदार मागणी केली. कोणत्याही सदस्याला विचारात न घेता विकास समिती स्थापन केली. ही पूर्णपणे चुकीच्या मार्गाने आणि नियमबाह्य पद्धतीने तयार केल्याने ती त्वरित रद्द करावी व स्टॅण्डींग कमिटी हीच असावी, अशी जोरदार मागणी केली. या बैठकीला अध्यक्ष सिद्धेश नाईक, उपाध्यक्ष दीक्षा कांदोळकर व सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत गदारोळ होण्याची शक्यता असल्याने बैठकीच्या आवारात पोलीस तैनात करण्यात आले होते.

पेट्रोल खर्चावरून उपाध्यक्षांनाही घेरले

उपाध्यक्ष दीक्षा कांदोळकर या आपल्या पदाचा दुऊपयोग करीत असून, त्यांनी तो थांबवावा अशी जोरदार मागणी सदस्यांनी बैठकीत केली. अध्यक्ष सिद्धेश नाईक यांच्या पाठिंब्यामुळे उपाध्यक्ष दीक्षा कांदोळकर याही पदाचा गैरवापर करीत असून, आपल्या खासगी वाहनासाठी महिन्याला 400 लीटर पेट्रोलचा खर्च जिल्हा पंचायत फंडातून कसा काय करता? असा थेट सवाल सदस्यांनी उपस्थित केला. या सर्व पेट्रोल खर्चाची माहिती द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केल्यामुळे दीक्षा कांदोळकर यांच्या या पेट्रोल खर्चाच्या विषयावरूनही बैठकीत वातावरण तापले.

बैठकीत घेतलेले ठराव

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article