महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर गोवा जि. पं. ची आज महत्वाची बैठक

11:42 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्यक्षांना जाब विचारण्याच्या तयारीत सदस्य : 85 दिवसानंतर होणार बैठक

Advertisement

पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्यांनी विद्यमान अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर 85 दिवसानंतर आज गुरुवारी जि. पं. सदस्यांची महत्त्वाची बैठक होत असून ती वादळी ठरण्याची शक्यता आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमध्ये विकासकामे ठप्प झालेली आहेत. अध्यक्ष मुळीच सहकार्य करीत नाहीत. अशा अनेक तक्रारी सदस्यांनी मांडल्या, पण पक्षाने दखल घेतली नाही. त्यामुळे सदस्यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि सिद्धेश नाईक यांना बैठक घेण्याचा आग्रह धरला.

Advertisement

तानावडे यांनी घेतली दखल

तुम्हाला बैठक कशाला हवी ? असे प्रश्न विचारून ते सदस्यांना झिडकारत आले. त्यामुळे 25 पैकी 18 सदस्यांनी अध्यक्ष सिद्धेश नाईक यांच्या विरोधात अविश्वास ठरावासाठी स्वाक्षऱ्या केल्या. या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रात झळकल्यानंतर प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दखल घेतली व सदस्यांना शांत केले.

आज 85 दिवसानंतरची बैठक

दरम्यान, जि. पं. नियमानुसार मंडळाची बैठक 60 दिवसांच्या आत घेण्याचा नियम आहे. दोन महिने ओलांडून गेले तरी बैठक घेत नाही, अशा कैफियती सदस्यांनी तानावडे यांच्यासमोर मांडल्यामुळे तानावडे यांनी सिद्धेश नाईक यांना जि. पं. बैठक घेण्यास भाग पाडले. त्यामुळे मागील बैठकीपासून आज 85 दिवस होत आहेत.

अध्यक्षांना विचारणार जाब

आज उत्तर गोवा जिल्हा पंचायत मंडळाची बैठक होत असून या बैठकीत सदस्यांनी एकत्र येऊन अध्यक्ष सिद्धेश नाईक यांना चांगलाच जाब विचारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या जि. पं. बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पर्वरीत सचिवालयाच्या परिषदगृहात आज गुरुवारी सकाळी 10 वाजता ही बैठक होत असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज रहाण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता जास्त आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article