राघव लॉरेन्सच्या चित्रपटात नोरा‘
राघव लॉरेन्सच्या कंचना प्रेंचाइजीच्या चौथ्या चित्रपटासाठी कलाकार निश्चित झाले आहेत. यात पूजा हेगडे आणि नोरा फतेहीचे नाव सामील आहे. दोन्ही अभिनेत्री राघवसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. तर ‘कंचना 4’ चित्रपटाद्वारे नोरा ही तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. पूर्ण कंचना फ्रेंजाइजी लॉरेन्सकडून दिग्दर्शिन असून तोच मुख्य भूमिकेतही आहे. फ्रेंचाइजीचा पहिला चित्रपट मुनी (2007) होता, ज्यात त्याने राज किरणसोबत काम केले होते. 2011 मध्ये कंचना हा चित्रपट त्याने तयार केला, ज्यात सरथ कुमार यांनी मुख्य भूमिका साकारली होती. कंचना 2 चित्रपटात तापसी पन्नू आणि नित्या मेनन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर कंचना 3 चित्रपटात ओविका आणि वेधिका होती. कंचना 4 चित्रपट कलानिधी मारन यांचा सन पिक्चर्स आणि राघव लॉरेन्स्च्या राघवेंद्र प्रॉडक्शनकडून निर्माण करण्यात आला आहे. पूजा यापूर्वी कुली चित्रपटात दिसून आली होती. तसेच ती ‘जन नायकन’ या चित्रपटात दिसून येणार आहे.