महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शंकरगौडा पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्या

10:32 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : भाजप नेते शंकरगौडा पाटील हे मागील 35 वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आजवर मिळालेल्या पदांचा वापर करत बेळगावच्या विकासासाठी हातभार लावला. यामुळे बेळगावसाठी काम केलेल्या शंकरगौडा पाटील यांनाच भाजपने येत्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी मागणी अॅड. एन. आर. लातूर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. विविध समाज व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या मंगळवारी पत्रकार परिषद घेत शंकरगौडा पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत मागणी केली. भाजपमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. तर काही जणांना बाहेरून आणून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा रंगत आहे. अशातच शंकरगौडा पाटील यांच्यासारख्या प्रामणिक नेत्याला उमेदवारी दिल्यास बेळगावच्या विकासात भर पडेल. त्यांनी कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी असताना अनेक विकासकामांना प्राधान्य दिले. आमदारकीच्या निवडणुकीतही अवघ्या काही मतांनी पराभव झाला. त्यामुळे येत्या लोकसभेसाठी त्यांना संधी देण्याची मागणी उद्योजक एच. डी. काटवा यांनी केली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी म्हणाले, शंकरगौडा पाटील हे सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यालाच उमेदवारी देणे महत्त्वाचे ठरेल. यावेळी चंद्रकांत मजगी, मदनकुमार भैरप्पण्णावर, नीळकंठ मास्तमर्डी, अॅड. विजय पाटील, उद्योजक विजय पाटील, सुनील देशपांडे यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article