नोकियाचा सर्वात मोठा प्रकल्प होणार तामिळनाडूत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बहुराष्ट्रीय दूरसंचार कंपनी नोकिया चेन्नईमध्ये जगातील सर्वात मोठे निश्चित नेटवर्क टेस्टबेड (फिक्स्ड नेटवर्क टेस्टबेड) सेट करण्यासाठी शुक्रवारी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. हे टेस्टबेड नोकियाच्या 10 गिगाबाईट (जी), 25जी, 50जी, आणि 100 जी पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क्समध्ये तांत्रिक नवकल्पनांचे नेतृत्व करेल. सुमारे 450 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बांधले जाणारे हे केंद्र नोकियाच्या सर्वात मोठ्या संशोधन आणि विकास व प्रयोगशाळांपैकी एक राहणार आहे. सदरचे फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस, बहु-निवास युनिट सोल्यूशन्स, अॅक्सेस नेटवर्क्स आणि होम कंट्रोलर्सवर देखील लक्ष केंद्रित करणारे राहणार आहे.
नेटवर्कच्या विकासाला चालना
पुढील पिढीच्या नेटवर्कच्या विकासाला चालना मिळेल. तामिळनाडू सरकारचे उद्योग, गुंतवणूक प्रोत्साहन आणि वाणिज्य मंत्री टी. आर. बी. राजा म्हणाले, ‘आज तामिळनाडू संशोधन आणि विकास आणि तंत्रज्ञान सेवांसाठी जागतिक गंतव्यस्थान बनले आहे. नोकिया तामिळनाडूच्या वाढीमध्ये दीर्घकाळ भागीदार आहे आणि नोकियाची नवीन फिक्स्ड नेटवर्क लॅब, जगातील सर्वात मोठी लॅब, चेन्नईमध्ये स्थापन केली जाईल ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
नोकियाचे केंद्र सिरुसेरी, तामिळनाडूत होणार
सॅन फ्रान्सिस्को येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री (सीएम) एमके स्टॅलिन जे नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी यूएसच्या 17 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 2021 मध्ये द्रविड मुन्नेत्र कडघम सत्तेत आल्यानंतर स्टॅलिनचा हा पाचवा विदेश दौरा आहे. तामिळनाडूसाठी गुंतवणूक प्रस्ताव आकर्षित करण्यासाठी त्यांनी यापूर्वी संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, जपान आणि स्पेनला भेट दिली होती.