महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

11 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

10:22 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बसवण कुडचीतील प्रकाराने संताप : उन्हाळ्यातच पाणी नसल्याने भटकंती

Advertisement

बेळगाव : बसवण कुडची येथील मुख्य रस्त्यावरील पहिल्या बसथांब्यावरील अर्ध्या गल्लीलाच पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गेल्या 11 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एल अॅण्ड टी कंपनीकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र तो पाणी पुरवठा दूषित असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली. मुख्य रस्त्यावरच पाईप फुटली आहे. पाईप दुरुस्तीसाठी जेसीबीने ख•ा काढण्यात आला. मात्र दुरुस्तीच करण्यात आली नाही. याबाबत एल अॅण्ड टी कंपनीकडे तक्रार केली असता उद्या दुरुस्ती करतो, असे उत्तर दिले जात आहे. मात्र 11 दिवस उलटले तरी त्याची दुरुस्ती नाही आणि पाणीपुरवठाही नाही. जवळपास 25 घरांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. या परिसरातील सर्व नागरिकांनी घरपट्टी तसेच पाणीपट्टीदेखील भरली आहे. पाईप दुरुस्ती करण्यासाठी केवळ 1 ते 2 तास अवधी लागतो. मात्र एल अॅण्ड टी कंपनीने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तातडीने याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा बसवंत कल्लाप्पा तारिहाळकर यांनी व नागरिकांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article