१२८ पैकी एकाही जागेवर विजय नाही
मनसेची दारूण पराभव
कोल्हापूरः
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये एकूण १२८ उमेद्वार रिंगणात उभे केलेले. त्यापैकी एकही जागेवर पक्षाला विजय मिळवता आला नाही. या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा माहिम मतदार संघाची झाली. या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उभारले होते. पण या पक्षाला एकाही जागेवर यश मिळवता आले नाही.
महाराष्ट्रच्या विधानसभा निवडणूकीत अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १४ उमेद्वार विधानसभेवर निवडणून आलेले होते. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पक्षाने राज्यभरात एकूण १२८ जागांसाठी निवडणूक लढवली.
माहिम व दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला तो मी नम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकरतो, अशी प्रतिक्रिया विधानसभा पराभवानंतर अमित ठाकरे यांनी सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये दिली.