शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्लास्टिक बंदी, पहिल्या टप्प्यात प्लास्टिक बॉटलवर बंदी
कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्लास्टिक बॉटल वापरण्यावर बंदी
By : आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : प्रशासन लोकाभिमुख करणारे 100 दिवस या उपक्रमाअंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाणे प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय शाहूपुरी पोलीसांनी घेतला आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्लास्टिक बॉटल वापरण्यावर बंदी घातली आहे. यासाठी त्यांनी 30 बॉटल पोलीस स्टेशनसाठी खरेदी केल्या असून, या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशनचा आवार स्वच्छ आणी सुंदर असला की कर्मचाऱ्यांना काम करण्यास आणखीन उत्साह येतो.
यामुळे पोलीस ठाण्याची स्वच्छता करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीची पुढाकार घेतला आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून एक दिवस दोन तास पोलीस स्टेशनच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी देत आहेत. पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ असावा यासाठी कोणतीही तपासणी नसतानाही इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
सुमारे 50 कुंड्या आणून यामध्ये वृक्षारोपण केले आहे. याचसोबत जमा झालेला कचरा गोळा करण्यासाठी 40 डस्टबीन तयार करण्यात आले आहेत. आठवड्यातून एक दिवस श्रमदान शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस पोलीस स्टेशनच्या स्वछतेसाठी हा उपक्रम सुरु केला आहे.
पोलीस ठाण्याची स्वच्छता करण्यासाठी आठवड्यातून मंगळवार किंवा शुक्रवारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्वत: पोलीस स्टेशनची स्वच्छता करतात. सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरातील दोन तास सर्वच कर्मचारी पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करतात. दोन टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांची टीम करुन ही साफसफाई करण्यात येते. मुद्देमाल रुमशाहूपुरी पोलीस ठाण्याची हद्द मोठी आहे.
यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्हयांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये जमा होणाऱ्या मुद्देमालाची संख्याही अधिक आहे. याला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी मुद्देमाल रुमही चकचकीत करुन घेतली आहे. अडगळीत आणि अस्ताव्यस्थ पडलेला मुद्देमालासाठी एक लोखंडी रॅक तयार केले आहे. यासाठी 100 प्लास्टिकचे बॉक्स आणण्यात आले आहेत. या बॉक्समध्ये वर्षानुसार मुद्देमाल ठेवण्यात आला आहे.
गुन्ह्यात जप्त होणारी वाहने लावण्यासाठी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारत व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर दर्शन पोलीस स्टेशनच्या बाहेर कोल्हापूरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती देण्यात आली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्थानक नजीक असल्यामुळे पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला जिह्यातील विविध पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणांची सविस्तर माहिती देणारे फलक लावले आहेत.