कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फलटणमध्ये नो पार्किंग झोन संकल्पनेचा बोजवारा

01:15 PM Aug 28, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

फलटण / किरण बोळे :

Advertisement

फलटण शहरातील वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे असताना तसे प्रयत्न होत असताना दिसून येत नाहीत, त्याच बरोबर शहरात घोषित करण्यात आलेल्या 'नो पार्किंग झोन' या संकल्पनेचा पुरता बोजवारा उडाला असून याबाबत पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्तरित्या पाऊले उचलण्याची गरज प्रकर्षाने भासत असली तरी हे दोन्ही विभाग केवळ बोलघेवड्याची भूमिका बजावत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

Advertisement

२०२३ साली ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस फलटण नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी संजय गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून फलटण शहरामध्ये पाच ठिकाणी 'नो पार्किंग झोन' घोषित केले होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डी. एड. कॉलेज चौक, गजानन चौक, रव. अशोकराव भोईटे चौक (डेक्कन चौक), छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख व वर्दळीच्या चौकांचा समावेश होता. दि. १ सप्टेंबर २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जाहीरही केले होते. त्याचबरोबर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियम अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी लोकांना धोका, अडथळा किंवा गैरसोय होईल अशा प्रकारे गाडी उभी करणे, या गुन्हयासाठी प्रथम वेळी रक्कम ५०० रुपये व व्दितीय वेळी रक्कम १५०० रुपये इतका दंड आकारण्यात येईल, असा इशाराही फलटण नगर परिषदेच्यावतीने दिला होता. त्याचबरोबर फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण नगरपरिषद यांचे संयुक्त नियोजनाने शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, शहरामध्ये नगर परिषद कार्यालय लगतचे तत्कालीन मुधोजी वाहनतळ व डेक्कन चौक येथील वाहन तळ या दोन ठिकाणी विनामुल्य वाहन पार्किंगची व्यवस्था केली असून त्या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करण्याचे आवाहन केले होते. परंतु सदर निर्णय व घोषणा यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नाही व त्या दृष्टिने कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत. त्यामुळे नो पार्किंग झोनची घोषणा हवेतच विरल्याचे व या संकल्पनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या फलटण शहरात आजही ठिकठिकाणी दिसुन येत आहे. फलटण नगर पालिकेने वाहनतळासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. लाखो रुपये खर्चुनही पोलीस यंत्रणा व नगरपालिका यांच्यात ताळमेळ नसल्याने व नियोजना अभावी हे वाहनतळ वाहनाअभावी ओस पडले आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पार्किंगचा फज्जा उडत असताना या समस्येवर पोलीस व नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे तोडगा काढणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे.

फलटण शहरात नगरपालिकेने वाहनतळासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. नगरपालिकेच्या इमारतीनजीक पूर्वीची अनेक वर्षांपासून लहान मुलांसाठी असणारी 'मालोजी पार्क' ही बाग काढून त्या ठिकाणी वाहनतळाची निर्मिती करण्यात आली. परंतु त्या वाहनतळाचा वापर योग्य नियोजनाअभावी झाला नाही, त्यातच आता या वाहनतळाच्या जागी नगरपालिकेच्यावतीने दुकान गाळे काढण्याचे काम सध्या सुरु आहे, अशा कारभारामुळे नगरपालिका प्रशासनाची निर्णय प्रक्रियेची मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

बांधकाम परवानगीमध्ये समाविष्ट असलेल्या काही अपार्टमेंट मधील वाहनतळ व्यवस्था ही अनेक ठिकाणी कम्प्लिशन मिळेपर्यंत दिसते, परंतु त्यानंतर त्याचा वापर व्यवसायिकदृष्ट्या होत असल्याने तेथे पार्किंगची समस्या कायम राहते. दुकानांनसमोर व अपार्टमेंटसमोर त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा न सोडल्याने बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने लावली जातात. त्यामुळे पार्किंगचा फज्जा उडतो व वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

शहरातील वाहतूक नियंत्रण, नियमन व कारवाईसाठी सहाय्यभूत व्हावे या उद्देशाने नगरपरिषदेने लक्षावधी रुपये खर्च करून टोइंग व्हॅन खरेदी केली आहे. या व्हॅनसाठी आवश्यक चालक व कर्मचारी नियुक्त करूनही गेल्या काही वर्षात या व्हॅनचा कोठेही उपयोग झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एवढा मोठा खर्च व पगाराचे पैसे नियोजना अभावी पाण्यात गेल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article