महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोणीही पक्ष सोडणार नाही!

11:57 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचा विश्वास

Advertisement

बेंगळूर : कोणीही भाजप पक्ष सोडणार नाही. आगामी काळात इतर पक्षातून अनेक नेते भाजपात येतील, असे सुतोवाच भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केले. म्हैसूर येथे सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस पक्ष भाजप आणि निजदमधील आमदारांना गळ घालण्यासाठी ‘ऑपरेशन हस्त’ राबवत असल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन काम करेन. कोणीही भाजपमधून बाहेर पडणार नाही. उलट काँग्रेसमधील नेते भाजपात येतील, असे त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी बोलावण्यात आलेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बसनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी यांनी त्यांचे मत मांडले आहे. त्यात गैर नाही. दोन्ही नेत्यांची भेट घेऊन चर्चा करेन. त्यांना विश्वासात घेऊनच काम करेन. पक्षात लहानसहान मतभेद असू शकतील. परंतु, सर्वजण मिळून पक्षसंघटना करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

मोदींचे हात बळकट करणार

येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 28 पैकी 28 जागा जिंकून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्याचे प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले. भाजपमधील मतभेदाविषयी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टिप्पणीवर बोलताना विजयेंद्र यांनी, लोकसभा निवडणुकीनंतर कोणत्या पक्षातील मतभेद उफाळून येईल, हे समजेल, अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावरून जितक्या लवकर खाली उतरवता येईल, तितक्या लवकर मुख्यमंत्री बनता येईल, या भ्रमात डी. के. शिवकुमार आहेत. तर शिवकुमार यांना बांधून ठेवण्यासाठी आणखी किती जणांना उपमुख्यमंत्री बनविता येईल, या विचारात सिद्धरामय्या आहेत. या चढाओढीत काँग्रेस सरकारकडून राज्यातील जनतेवर अन्याय झाला आहे. केवळ केंद्र सरकारवर ठपका ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article