कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही : येडियुराप्पा
बेंगळूर : कायद्यानुसार जे होईल ते होईल. देशाच्या कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. महिलेचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटीने अटक केलेले माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि पेनड्राईव्ह प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. कायद्यानुसार सर्व कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यांनी काही चूक केली असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे कुमारस्वामी यांनी स्वत: म्हटले आहे. कायद्यापुढे झुकत एच. डी. रेवण्णा एसआयटीला शरण आले आहेत. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांना वेदना होणारी घटना घडली असून हे अतिशय दु:खद आहे. सत्य लवकरात लवकर बाहेर यावे. देवेगौडांनी याची फार काळजी करू नये. त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी विनंती बी. एस. येडियुराप्पा यांनी केली आहे.