महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरकारकडून अबकारी करवाढ नाही!

06:22 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री आर. बी. तिम्मापूर यांचे स्पष्टीकरण

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारे मद्यारील करात वाढ करण्यात आलेली नाही. मद्य उत्पादकांनी दरवाढ केलेली असावी. अबकारी करात वाढ करायची असेल तर आधीच कळविण्यात येईल. मद्यावरील करामध्ये वाढ करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. मद्यविक्रीसाठी टार्गेटही दिलेले नाही. मात्र, करसंकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी दिले.

यापूर्वी सर्व प्रकारच्या मद्याचे दर 17 टक्क्यांनी वाढविण्यात आले होते. आता पुन्हा अती पसंतीच्या मद्याच्या ब्रँडकडून दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. मद्य विक्रेत्यांनी दरवाढ केली असावी. सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या मद्य दरात वाढ करण्यात आलेली नाही. अबकारी करात वाढ करायची असेल तर आधी कळविले जाते, असे त्यांनी सांगितले.

यंदा नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री झालेली नाही. दरवर्षीप्रमाणे विक्रीत तेजी दिसून आली आहे. करवाढ केल्यास सर्वांना आधी सांगितले जाईल. कर पूर्वीप्रमाणेच आहे. उत्पादकांकडून दरवाढ केली जाऊ शकते. सरकारकडे कर मात्र भरला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article