मगरींच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप नको ! प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळा
नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज
सांगली प्रतिनिधी
सध्या मुलांच्या शाळा-कॉलेजला सुट्ट्या सुरू होत आहेत. उन्हाळासुद्धा कडक आहे. त्यामुळे नदीला पोहायला जाणे, पाण्यात डुंबणे, मासेमारी करणे आदी प्रकार सुरू होतील. या उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळीसुद्धा फार नाही. वारणा व कृष्णा नदीपात्राच्या आसपास असणाऱ्या मगरींनी त्यांची घरटी पूर्ण केली आहेत. काही ा†दवसांत त्या घरट्यातून ा†पले बाहेर येतील व नदीपत्रात उतरतील. या काळात मगरी त्यांच्या घरट्यांचे संरक्षण व ा†पलांचे संगोपन करण्याच्या हेतूने त्यांनी केलेल्या घरट्याच्या आसपास वावरताना आढळतात. स्वभावाने शांत असलेली मगर त्यांच्या प्रजनन काळात घरट्याच्या व पिलांच्या संरक्षणासाठी आक्रमक होतात. त्यामुळे नागा†रकांनी नदीपात्राचा वापर करत असताना काळजी घेण्याची गरज आहे.
याआधी नदीकाठावर मगरींच्या हल्ल्यांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या भागात मगरींचे हक्काचे निवासस्थान असल्याने नागरिकांनी उन्हाळ्यात पोहायला गेल्यावर काळजी घेण्याची गरज आहे. मगरींचा वावर असलेल्या भागात काळजी घेवून आपली शेतातील कामे केली पा†हजेत. मगरीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याची मा†हती गावातील लोकांना द्यावी. जेणेकरून त्या पा†रसरातील इतर लोक काळजी घेतील व मगरींकडून होणारे हले थांबवता येतील. मगर माणसांवरच हले करते असे नाही, तर त्यांच्या अंडी घातलेल्या जागेत अथवा पिलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न इतर प्राण्यांकडून झाल्यास त्यांच्यावर मगरीच्या हल्ल्याची शक्यता जास्त असते. यासाठी गावामध्ये, घाटावर किंवा पाण्यात मगर दिसल्यास त्वरीत स्वत:हून खात्री करा. वनविभागाला 1926 या नंबरवर फोन करून कळवा किंवा प्रत्यक्षात जाऊन माहिती द्या. लोकांना मगरीपासून दूर ठेवा. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. दगड किंवा काठीने मारू नका, असे केल्याने ती आक्रमक होऊ शकते.
गावकऱ्यांना मगर दिसत असलेल्या जागेबाबत सतर्क करा. त्या क्षेत्राला प्रतिबंधित करा व लोकांना त्या क्षेत्रापासून दूर ठेवा. मगरी जवळ इतर लोक गर्दी करून येत याची काळजी घ्या. वनविभागाच्या सुचनाशिवाय मगरीला घेरण्याचा, अडवण्याचा-पकडण्याचा प्रयत्न करू नका. वनविभागाचे कर्मचारी व इतर मदत येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून मगरीवर लक्ष ठेवा. शेजारी गोठा- घर असेल, तर घरातील लोकांना प्रथम बाहेर काढा व गोठ्यातील जनावरे लांब नेऊन बांधा. घराचे / गोठ्याचे दरवाजे बंद करून ठेवा. जवळ नदीपात्र असेल तर मगरीला नदीपात्रात जाण्याचा मार्ग मोकळा करून द्या, म्हणजे ती तिच्या अधिवासात निघून जाईल. विहीर किंवा तळ्यात आढळल्यास काही दिवस ते क्षेत्र प्रतिबंधित करा, असे वनविभागाने कळवले आहे.