कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उष्णतेची लाट नाही, तरीही खबरदारी घ्यावी

11:51 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हवामान खात्याचे स्थानिकांसह पर्यटकांनाही आवाहन

Advertisement

पणजी : राज्यात उष्णतेची लाट नसली तरीही पारा चढाच असल्याने प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. पुढील आठवडाभर राज्यात 33 ते 35 अंश तापमान राहणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा सामान्यापेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत खास करून पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांनी तसेच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्थानिकांनी विशेषत: सकाळी 11 ते दुपारी 3 च्या दरम्यान गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, उष्णतेपासून बचावासाठी हलके कपडे वापरणे, भरपूर जलप्राशन, सनक्रीन, छत्री आदी उपाययोजनांसह योग्य खबरदारी घ्यावी, असा सल्ला खात्याने दिला आहे. हवामान खात्याने तापमान वाढीचा अंदाज वर्तविल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दृष्टी मरीन लाईफ यासारख्या संस्थांनीही राज्यातील लोक आणि देशी विदेशी पर्यटकांना जागरूक करण्यास प्रारंभ केला असून उन्हाळ्यात किनाऱ्यांवर जाणाऱ्या लोकांनी सुरक्षा उपाययोजना पाळण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यातील विविध किनाऱ्यांवर 35 लाईफगार्ड टॉवर्स आहेत. त्याद्वारे 450 लाईफगार्ड कार्यरत असतात. उष्णतेमुळे शरीरावर फोड येणे, प्रखर सूर्यप्रकाशामुळे दिवसभर हायड्रेटेड राहण्याची खात्री करणे, दुपारी समुद्रात उतरणे टाळावे. आपत्कालीन प्रसंगात त्यांची मदत घ्यावी, त्यांच्या सल्ल्याशिवाय पाण्यात उतरू नये. तरीही उतरायचेच असेल तर पोहण्यासाठी सुरक्षित परिसरातच आंघोळ करावी, असे दृष्टीने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article