For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई-गोवा महामार्गासाठी ठेकेदारांना मुदतवाढ नाही

10:32 AM Jul 11, 2025 IST | Radhika Patil
मुंबई गोवा महामार्गासाठी ठेकेदारांना मुदतवाढ नाही
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गाचे गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेत ठेकेदारांना 'नो एक्स्टेंशन'चा इशाराच दिला आहे. कामाला लागलेला विलंब आणि वाढणारा खर्च यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश बजावले आहेत. तर या महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाढीव खर्च २५० ते ३०० कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या १४ वर्षापासून काम अपूर्ण असल्याने शासनाला विरोयक आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या राष्ट्रीय महामार्गाची वारंवार पाहणी करत आहेत. अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या. परंतु त्याही या मागनि खोट्या ठरवल्या आहेत. विशेष करून संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन टण्यांचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. शासनाने अनेक ठेकेदार कंपन्या बदलल्या, परंतु काम काही पूर्ण झाले नाही. या दोन्ही टप्यांसाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ठेकेदारांनी दिल्लीतील बैठकीत केली होती. परंतु गडकरींनी ती फेटाळून लावली व आहे त्या मुदतीतच काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले. त्यामुळे आता अपूर्ण राहिलेले हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Advertisement

  • गडकरींचा ठेकेदारांना स्पष्ट इशारा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम आता ते पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत गडकरींशी ठेकेदारांनी चर्चा केली. यावेळी आरवली ते कांटे आणि कांट ते वाकेड या दोन टप्प्यांच्या ठेकेदारांनी मुदतवाढ मागितली. पण ती मुदतवाढ गडकरींनी स्पष्टपणे फेटाळून लावली. या बैठकीत गडकरींनी ठेकेदारांना स्पष्ट शब्दात समज दिली. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करणे, हाच आपला एकमेव अजेंडा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मार्च २०२६ या अंतिम मुदतीतच काम पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश त्यांनी ठेकेदारांना दिले.

  • १४ वर्षांच्या विलंबाने वाढला खर्च

या महामार्गाचे काम दीर्घ काळ लांबत्त्याने मूळ अंदाजपत्रकापेक्षा सुमारे ३० टक्के वाढ होणार आहे. यामुळे अंदाजे २५० ते ३०० कोटी रुपयांचा वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे. वाढलेले स्टीलचे दर, भूसंपादन खर्च आणि मजुरी यामुळे खर्चातही वाढ झाली आहे. केंद्र शासनाने आता हा मार्ग पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

  • कोकणातील आणखी ३ मार्गाचे होणार चौपदरीकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गासोबतच कोकणातील आणखी तीन महत्वाच्या मार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. सध्या दुपदरी असलेल्या या मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. यामध्ये सावंतवाडी ते आंबोली, तरळा ते गगनबावडा आणि गुहागर ते चिपळूण या सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश आहे. १ किलोमीटरला सुमारे २० कोटी याप्रमाणे या तीन मार्गाना सुमारे १,२०० कोटी रुपये लागणार आहेत. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

  • मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले दोन महत्वाचे टप्पे

आरवली ते कांटे: हा ३९ किलोमीटरचा टप्पा असून त्याचे मूळ काम सुमारे ६९२ कोर्टीचे आहे, परंतु ते अजूनही अपूर्ण आहे. कांटे ते वाकेड : हा ४९ किलोमीटरचा टप्पा असून त्याचे अंदाजित बजेट ८०० कोटींचे आहे. या टप्प्याचेही काम अजून अपूर्ण आहे.

Advertisement
Tags :

.